माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने सोमवारी विजयाची हॅटट्रिक साजरी केली. गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने सलग तिसऱ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडला नमवले. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात तीन विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना इंग्रजीत बोलावे लागते आणि शमीचं इंग्रजी कसं आहे, हे सांगायला नको. मात्र, सोमवारी त्याने फाडफाड इंग्रजी बोलून अँकरसह कर्णधार विराट कोहलीला आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर अँकरने जी प्रतिक्रिया दिली, ती ऐकून कोहलीला हसू आवरले नाही.
पुरस्कार वितरण सोहळ्यात अँकर सायमन डौलने शमीला इंग्रजीत प्रश्न विचारला. शमीच्या हिंदीचे भाषांतर करून सांगण्यासाठी कर्णधार कोहलीही उपस्थित होता. मात्र, शमीनं त्याला संधी दिलीच नाही. डौलच्या प्रश्नाचं शमीनं इंग्रजीतच उत्तर दिले. शमीचं फाडफाड इंग्रजी ऐकून अँकर चकीत झाला आणि तोच चक्क हिंदी बोलू लागला. तो म्हणाला, तुझे इंग्रजी फार चांगले आहे. 2008-09 साली भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडमध्ये 3-1 च्या फरकाने वन-डे मालिका जिंकली होती.पाहा व्हिडीओ...