नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. भारतीय संघाने 8 विकेट्स राखून यजमान न्यूझीलंडला पराभूत केले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कुलदीप यादव, मोहम्मद शमी व युजवेंद्र चहल यांनी गोलंदाजीत, तर शिखर धवन व कोहली यांनी फलंदाजीत योगदान देत भारताचा विजय पक्का केला. पण, या विजयाचा खरा मास्टरमाइंड कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आहे, असे म्हणाल्यास आश्चर्य वाटायला नको.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. मोहम्मद शमीने त्यांना सुरुवातीलाच धक्के देत हतबल केले. त्यानंतर कुलदीप व चहल यांनी किवींचे धाबे दणाणून टाकले. कर्णधार केन विलियम्सन एकाकी खिंड लढवत होता, परंतु त्याला कुलदीपने माघारी पाठवले. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 38 षटकांत 157 धावांवर माघारी परतला. त्यानंतर धवन ( नाबाद 75) आणि कोहली (45) यांनी भारताचा विजय पक्का केला.
या चित्रात धोनी दिसत नसला तरी पडद्यामागून त्याने आपली भूमिका चोख बजावली. त्याने भारतीय फिरकीपटूंना यष्टिमागून केलेले मार्गदर्शन भारताच्या पथ्यावर पडले. त्यामुळे न्यूझीलंडच्या धावांवर लगाम लावण्यात भारतीय संघाला यश आले. विश्वास बसत नाही, मग हा व्हिडीओ पाहा...