मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर उपांत्य फेरीचा समाना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ प्रत्येकी सातव्यांदा उपांत्य फेरीत पोहाचले आहेत. मात्र या दोन संघांदरम्यान पहिल्यांदाच उपांत्य सामना खेळला जाणार आहे. विराट कोहली व केन विलियम्सन यांना 11 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देणाराही हा सामना असणार आहे. 11 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातही भारत- न्यूझीलंड अशीच लढत झाली होती. त्यावेळी भारताने तीन विकेट राखून विजय मिळवला होता.
त्यावेळीही केन विलियम्सन न्यूझीलंडचा कर्णधार होता आणि आपला कर्णधार विराट कोहली. आता हे दोघेही पुन्हा एकदा त्याच भूमिकेत, परंतु वरिष्ठ संघातून एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोहलीच्या त्या विकेटची चर्चा सुरू झाली आहे. 2008च्या त्या सामन्यात कोहलीनं गोलंदाजी केली होती आणि त्याने विलियम्सनची विकेट घेतली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात कोहली गोलंदाजी करेल का, याची उत्सुकता लागली आहे.
पाहा कोहलीनं कसं विलियम्सनला बाद केले...
आज गोलंदाजी करणार का?
ही खूप चांगली आठवण आहे आणि पुन्हा एकदा उपांत्य फेरीत समोरासमोर आल्याचा दोघांनाही आनंद होत आहे. असा दिवस पुन्हा येईल, असे आम्हा दोघांनाही त्यावेळी वाटले नव्हते. मी तेव्हा खरचं केनची विकेट घेतली होती, पण आता तसं घडण्याची शक्यता कमीच आहे,'' असे कोहलीनं सांगितले.
भारताचा संभाव्य संघ : लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव/दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा/कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंडच्या संघात एक बदल अपेक्षित आहे. टीम साऊदीच्या जागी ते लॉकी फर्ग्युसनला संधी देऊ शकतात..
न्यूझीलंडचा संघः मार्टिन गुप्तील, हेन्री निकोल्स, केन विलियम्सन, रॉस टेलर, टॉम लॅथम, जेम्स निशॅम, कॉलीन डी ग्रँडहोम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
Web Title: India Vs New Zealand, Semi News, ICC World Cup 2019: When Virat Kohli dismissed Kane Williamson during India vs New Zealand U19 World Cup semi final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.