मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी होणारा उपांत्य फेरीचा सामन्यावर पावसाचे सावट आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी पावसाची शक्यता 50 टक्के आहे आणि त्यामुळे सामना थोडा उशीरा सुरू होऊ शकतो. पण, या सामन्यावर सट्टेबाजांनी जोरदार सट्टा लावायला सुरुवात केली आहे. लैडब्रोक्स और बेटवे या दोन्ही ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या वेबसाइट्स आहेत. या सामन्यात भारतन्यूझीलंडवर मात करेल, असे या सट्टेबाजी कंपन्यांना वाटत आहे. त्यामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत जाणार, असे म्हटले जात आहे. पण, याचबरोबर सट्टाबाजारात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना सर्वाधिक भाव मिळाला आहे.
लैडब्रोक्सने भारताच्या विजयावर 13/8 असा भाव दिला आहे. त्याचबरोबर इंग्लंड (15/8), ऑस्ट्रेलिया (11/4) आणि न्यूझीलंडला (8/1) असे भाव दिले आहेत. या सट्टेबाजींने दिलेल्या भावानुसार भारतीय संघ हा वर्ल्ड कप स्पर्धेचा संभाव्य विजेता समजला जात आहे. बेटवे या सट्टेबाजी कंपनीने भारताला 2.8 असा भाव दिला आहे. त्याचबरोबर इंग्लंड (3), ऑस्ट्रेलिया (3.8) आणि न्यूझीलंडला (9.5) असे भाव दिले आहेत. बेटवे या कंपनीनुसारही भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल, असे म्हटले जात आहे.
रोहितसाठी 8/13 असा भाव लावला गेला आहे, त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला ( 11/8) आणि इंग्लंडच्या जो रूटला ( 20/1) असा भाव लागला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ( 33/1) असा भाव आहे. जर एखाद्यावर 13/8 असा भाव लागला असेल, तर त्या खेळाडूवर जेवढे पैसे लागले असतील आणि विजयी रकमेला 13ने गुणून आणि नंतर 8ने भागून विजेत्याला रक्कम दिली जाईल.
Web Title: India vs New Zealand, semi-news: Rohit Sharma's highest rate in the betting market compaire to Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.