India Vs New Zealand Series: टी-20 विश्वचषकात टीम इंडियाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यासह टीम इंडियाचा प्रवास संपला आणि विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भंगले. भारतीय संघाने आतापर्यंत फक्त एकदाच विश्वचषक जिंकला आहे, तोही 2007 मध्ये. आता पुढील विश्वचषकासाठी प्रतीक्षा आणखी वाढली आहे. आता तो पराभव विसरून पुढे जावे लागणार आहे.
टीम इंडिया 18 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका खेळणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाचा सामना केन विल्यमसनच्यान्यूझीलंड संघाशी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत पोहोचले होते.
भारत-न्यूझीलंड T20 मालिकेचे वेळापत्रक (भारतीय वेळ)• पहिला T20: 18 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 (वेलिंग्टन)• दुसरा T20: 20 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (माउंट मौनगानुई)• तिसरा T20: 22 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (नेपियर)• पहिला एकदिवसीय: 25 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 (ऑकलंड)• दुसरा वनडे: 27 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 (हॅमिल्टन)• तिसरा वनडे: 30 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 (ख्रिस्टचर्च)
भारत-न्यूझीलंड मालिका कुठे बघता येईल?क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक माहिती आहे, पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळली जाणारी ही टी-20 आणि एकदिवसीय मालिका टीव्हीवर दाखवली जाणार नाही. ही मालिका अॅमेझॉन प्राइमच्या अॅप आणि वेबसाइटवर प्रसारित केली जाणार आहे. सोनी टीव्ही किंवा स्टार स्पोर्ट्सकडे याचे प्रसारण करण्याचे अधिकार नाहीत. पण, ही मालिका डीडी स्पोर्ट्सवर प्रसारित केले जाऊ शकते. कारण अनेकदा टीम इंडियाचे सामने त्यावर दाखवले जातात.
अनेक खेळाडूंना विश्रांतीभारतीय संघाने या मालिकेसाठी आपल्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन यांच्यासह अनेक खेळाडू या मालिकेत खेळणार नाहीत. प्रशिक्षक राहुल द्रविड देखील न्यूझीलंडला गेलेला नाही, त्याच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत.
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया - हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया - शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव. अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ - केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.
वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ - केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउदी.