वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिका सहा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. आतापर्यंत जर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये यजमानांचे पारडे जड आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत 9 ट्वेंटी-20 सामने झाले आहेत. या 9 ट्वेंटी-20 सामन्यांपैकी न्यूझीलंडने सहा लढतींमध्ये विजय मिळवला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 2007 साली पहिला ट्वेंटी-20 सामना खेळवला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंडनेच बाजी मारली होती. त्यानंतर सलग दहा वर्षे भारताला न्यूझीलंडवर ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवता आला नव्हता.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील द्विदेशीय मालिकांचा निकाल
- भारताचा न्यूझीलंड दौरा (2008/09)- न्यूझीलंडने 2-0 (2) फरकाने मालिका जिंकली.
- न्यूझीलंडचा भारत दौरा (2012)- न्यूझीलंडने 1-0 (2) फरकाने मालिका जिंकली.
- न्यूझीलंडचा भारत दौरा (2017/18)- भारताने 3 सामन्यांची सीरीज 2-1 फरकाने मालिका जिंकली.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. रोहितने 12 ट्वेंटी-20 सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि त्यात 11 विजय मिळवण्यात भारताला यश आले. दुसरीकडे कोहलीने 20 ट्वेंटी-20 सामन्यांत नेतृत्व करताना भारताला 12 विजय मिळवून दिले आहेत. रोहितला आगामी ट्वेंटी-20 मालिकेत विजय मिळवून कर्णधार म्हणून कोहलीचा सर्वाधिक ट्वेंटी-20 सामने जिंकण्याचा विक्रम नावावर करण्याची संधी आहे. या विक्रमात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 41 विजयांसह ( 72 सामने) आघाडीवर आहे.
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ( किमान पाच सामने) भारतीय कर्णधार म्हणून रोहितची विजयाची टक्केवारी अधिक आहे. रोहितची विजयी टक्केवारी 91.66 इतकी आहे, तर कोहलीची टक्केवारी 63.15 अशी आहे. वीरेंद्र सेहवाग (1 सामना) आणि सुरेश रैना ( 3) यांची कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी 100 इतकी आहे.
Web Title: India vs New Zealand T20: New Zealand's nice record in Twenty-20 match against India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.