वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेलीत पहिला सामना बुधवारी खेळवला जाणार आहे. आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये यजमानांचे पारडे जड आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत 9 ट्वेंटी-20 सामने झाले आहेत आणि त्यापैकी न्यूझीलंडने सहा लढतींमध्ये विजय मिळवला आहे. पण, यंदा भारतीय संघ यजमानांना लोळवण्याच्याच तयारीत आहे. वन डे मालिकेत विश्रांती देण्यात आलेला रिषभ पंत ट्वेंटी-20 मालिकेसाठी संघात परतला आहे. पण, संघातील स्थान पक्के करण्यासाठी त्याने नावीण्यपूर्ण फटक्याचा शोध लावला आहे आणि मंगळवारी नेटमध्ये त्या फटक्याचा कसून सरावही त्याने केला.
तीन सामन्यांच्या मालिकेसाठी रिषभ पंत न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत पंतला विश्रांती देण्यात आली होती. त्या मालिकेत अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी संघात परतला होता. न्यूझीलंडमध्ये दाखल होताच, पंतने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला. वैविध्यपूर्ण फलंदाज म्हणून ओळख असलेल्या पंतने नेट्समध्येही नावीण्यपूर्ण फटकेबाजी केली. बीसीसीआयने त्याच्या फटकेबाजीचा व्हिडीओ पोस्ट केला.
पंतच्या नावीण्यपूर्ण फटक्याचा व्हिडीओ पाहा...