Join us  

T20 World Cup Ind vs NZ: न्यूझीलंडचं आव्हान भारी, अम्पायर तर त्याहून भारी; रेकॉर्ड पाहून भारतीय फॅन्सची झोप उडाली

T20 World Cup Ind vs NZ: भारतासाठी अनलकी ठरलेले पंच आजच्या सामन्यात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 2:38 PM

Open in App

दुबई: टी-२० विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धेत आज भारतासमोर न्यूझीलंड (India vs New Zealand)चं आव्हान आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. आज पराभूत झाल्यास न्यूझीलंड आणि भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर होईल. पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. तर पाकिस्तानकडून पराभूत झालेल्या न्यूझीलंड आणि भारतासाठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.

गेल्या १८ वर्षांत झालेल्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत एकदाही न्यूझीलंडला पराभूत करू शकलेला नाही. त्यामुळे भारतासमोर किवींचं मोठं आव्हान असेल. याशिवाय एका पंचांमुळेदेखील हा सामना महत्त्वाचा आहे. रिचर्ड कॅटलबोरो, मरेस एरॅस्मस आजच्या सामन्यात पंच म्हणून काम पाहतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातील ही मोठी नावं आहेत.

रिचर्ड कॅटलबोरो आणि भारताची कामगिरी हे समीकरण आतापर्यंत तरी वाईटच झाली आहे. २०१४ पासून भारत जेव्हा जेव्हा रिचर्ड कॅटलबोरो पंचगिरी करत असलेल्या आयसीसी स्पर्धांच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये खेळला, तेव्हा तेव्हा संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळेच आजचा सामना भारतासाठी आणखी महत्त्वाचा असेल.

२०१४ पासून आयसीसी स्पर्धांमध्ये भारत-२०१४ टी-२० विश्वचषक- श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामनानिकाल- श्रीलंका विजयी, पंच- रिचर्ड कॅटलबोरो, इयन गुल्ड

२०१५ ५० षटकांचा विश्वचषक- ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरीनिकाल- ऑस्ट्रेलिया विजयी, पंच- रिचर्ड कॅटलबोरो, कुमार धर्मसेना

२०१६ टी-२० विश्वचषक- वेस्ट इंडिज विरुद्ध उपांत्यफेरीनिकाल- वेस्ट इंडिज विजयी, पंच- रिचर्ड कॅटलबोरो, इयन गुल्ड

२०१७- चॅम्पियन करंडक- पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामनानिकाल- पाकिस्तान विजयी, पंच- रिचर्ड कॅटलबोरो, मरेस एरॅस्मस 

२०१९ विश्वचषक- न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य फेरीनिकाल- न्यूझीलंडचा विजय, पंच- रिचर्ड कॅटलबोरो, रिचर्ड इलिंगवर्थ

२०२१- जागतिक कसोटी अजिंक्यपद, न्यूझीलंडविरुद्ध अंतिम फेरीनिकाल- न्यूझीलंडचा विजय, पंच- रिचर्ड इलिंगवर्थ, मरेस एरॅस्मस, टीव्ही पंच- रिचर्ड कॅटलबोरो 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारत विरुद्ध न्यूझीलंड
Open in App