Join us  

IND vs NZ live T20I : भारत-न्यूझीलंड पहिली ट्वेंटी-२० रद्द होण्याच्या मार्गावर; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स 

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - नवा कर्णधार, नवी टीम अन् नवा जोश.... टीम इंडियाच्या भविष्याच्या दृष्टीने टाकलेल्या पावलांची आज पहिली परीक्षा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 10:28 AM

Open in App

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - नवा कर्णधार, नवी टीम अन् नवा जोश.... टीम इंडियाच्या भविष्याच्या दृष्टीने टाकलेल्या पावलांची आज पहिली परीक्षा आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताची युवा ब्रिगेड न्यूझीलंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर सामना करणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर आता BCCI ने २०२४च्या वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात केली आहे आणि हार्दिककडे ट्वेंटी-२० संघाचे सोपवण्याची तयारीही केली आहे. त्याची सुरूवात न्यूझीलंड दौऱ्यापासून होतेय, कारण या दौऱ्यावर रोहित, विराट, दिनेश या सीनियर्स खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. युवा खेळाडूंना सोबत घेऊन हार्दिक आज वेलिंग्टनवर उतरण्यासाठी सज्ज आहे, परंतु हा सामना रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

 हार्दिक पांड्या ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार; BCCI लवकरच घोषणा करणार, रोहितबाबत विधान

आजच्या सामन्यात रिषभ पंतला ओपनिंगला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते आणि त्याच्यासह इशान किशन हा असण्याची शक्यता आहे. याशिवाय संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल हेही पर्यात प्रभारी मुख्य प्रशिक्षक व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्यासमोर आहेत. गिल व इशन यांचे पारडे सध्यातरी जड वाटतेय, परंतु रिषभलाही संधी आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत युजवेंद्रला बाकावरच बसवून ठेवले गेले, परंतु आता चहल-कुलदीप यादव ही जोडी आज मैदानावर दिसू शकते. भुवनेश्वर कुमार याबाबत लक्ष्मण निर्णय घेऊ शकतो. उम्रान मलिक याला आज संधी आहे.   

  • मागच्या वेळेत भारतीय संघाने ५-० अशा फरकाने न्यूझीलंडवर विजय मिळवला होता.  
  • ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेल्या १५ सदस्यांपैकी केवळ ८ जणंच या दौऱ्यावर आले आहेत
  • एका वर्षात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोहम्मद रिझवानच्या सर्वाधिक १३२६ धावांचा विक्रम मोडण्यसाठी सूर्यकुमार यादवल २८६ धावा करायच्या आहेत.  

 

दरम्यान आजच्या लढतीवर पावसाचे सावट आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकते किंवा तो रद्दही करावा लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडपाऊसहार्दिक पांड्याकेन विल्यमसन
Open in App