India vs New Zealand T20I series: Live Scorecard - भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील निर्णायक सामना आज नेपियर येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. यजमानांना मालिका वाचवण्यासाठी तिसऱ्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचा आहे आणि कर्णधार केन विलियम्सन ( Kane Willliamson) याने माघार घेतली आहे. आज टीम साऊदी किवींचे नेतृत्व करणार आहे. केन विलियम्सनच्या जागी संघात मार्क चॅपमॅनची निवड करण्यात आली आहे. साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- भारत-न्यूझीलंड पहिली मॅच पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने ६५ धावांनी विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नाबाद १११ धावांच्या जोरावर भारताने १९१ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दीपक हुडाने चार विकेट्स घेत किवींचा डाव १२६ धावांत गुंडाळला.
- दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने अखेरच्या १६ चेंडूंत ५४ धावा चोपल्या होत्या आणि त्याला २०व्या षटकात स्ट्राईक मिळाली नव्हती. तरीही त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त अखेरच्या षटकांत भारताकडून सर्वाधिक ५८ धावांच्या विक्रमाला आव्हान दिले होते.
- दुसऱ्या सामन्यात टीम साऊदीने हॅटट्रिक घेत ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १३२ विकेट्सचा विक्रम नावावर केला. शाकिब अल हसन १२८ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेपियर येथे भारतीय संघ प्रथमच ट्वेंटी-२० लढत खेळणार आहे, यापूर्वी भारत येथे सात वन डे व दोन कसोटी सामने खेळला आहे.
दरम्यान, आज सामन्यापूर्वी नेपियर येथे मुसळधार पाऊस पडला आणि अद्याप खेळपट्टी सुकवण्याचं काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे ११.३० वाजता होणारी नाणेफेक लांबणीवर ढकलण्यात आली आहे. अर्धातास उशीराने नाणेफेक झाली आणि न्यूझीलंडच्या बाजूने कौल लागला. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आज हर्षल पटेलला संधी मिळाली. आजही संजू सॅमसनला खेळवले नाही. इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज
Web Title: India vs New Zealand T20I live scorecard update : India have made one change to their playing XI. Harshal Patel comes into the side in place of Washington Sundar, New Zealand opt to bat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.