Join us  

IND vs NZ live T20I : भारत-न्यूझीलंड पहिली ट्वेंटी-२० लढत रद्द; वेलिंग्टनवरून मोठे अपडेट्स

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - भारत-न्यूझीलंड यांच्यातली पहिली ट्वेंटी-२० लढत पावसामुळे रद्द करावी लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 1:29 PM

Open in App

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - भारत-न्यूझीलंड यांच्यातली पहिली ट्वेंटी-२० लढत पावसामुळे रद्द करावी लागली आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता हा सामना सुरू होणे अपेक्षित होते, परंतु मुसळधार पाऊस सुरूच आहे. दुपारी २.१७चा कट ऑफ टाईम ठेवला गेला होता. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे १.१७ वाजताच ही लढत रद्द करण्याचा निर्णय गेतला गेला. वेलिंग्टनमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे खेळाडू फुट- व्हॉलीबॉल खेळताना दिसले.  

  - मागच्या वेळेत भारतीय संघाने ५-० अशा फरकाने न्यूझीलंडवर विजय मिळवला होता.  - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेल्या १५ सदस्यांपैकी केवळ ८ जणंच या दौऱ्यावर आले आहेत- एका वर्षात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोहम्मद रिझवानच्या सर्वाधिक १३२६ धावांचा विक्रम मोडण्यसाठी सूर्यकुमार यादवल २८६ धावा करायच्या आहेत.  पावसामुळे या सामन्यात व्यत्यय निर्माण झाला आहे आणि ११.३० ला होणारी नाणेफेक पुढे ढकलण्यात आली होती. या वेळेत भारतीय खेळाडू किवींसोबत Foot Volleyball खेळत आहेत.सध्यातरी तेथे मुसळधार पाऊस पडतोय... 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडपाऊस
Open in App