India vs New Zealand T20I series: Live Scorecard - नवा कर्णधार, नवी टीम अन् नवा जोश.... टीम इंडियाच्या भविष्याच्या दृष्टीने टाकलेल्या पावलांची आज पहिली परीक्षा आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताची युवा ब्रिगेड न्यूझीलंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर सामना करणार आहे. पण, पावसामुळे या सामन्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. वेलिंग्टनमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच नाणेफेकीला उशीर होतोय. त्यामुळे भारत-न्यूझीलंडचे खेळाडू फुटबॉल व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहेत.
आजच्या सामन्यात रिषभ पंतला ओपनिंगला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते आणि त्याच्यासह इशान किशन हा असण्याची शक्यता आहे. याशिवाय संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल हेही पर्यात प्रभारी मुख्य प्रशिक्षक व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्यासमोर आहेत. गिल व इशन यांचे पारडे सध्यातरी जड वाटतेय, परंतु रिषभलाही संधी आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत युजवेंद्रला बाकावरच बसवून ठेवले गेले, परंतु आता चहल-कुलदीप यादव ही जोडी आज मैदानावर दिसू शकते.
- मागच्या वेळेत भारतीय संघाने ५-० अशा फरकाने न्यूझीलंडवर विजय मिळवला होता.
- ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेल्या १५ सदस्यांपैकी केवळ ८ जणंच या दौऱ्यावर आले आहेत
- एका वर्षात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोहम्मद रिझवानच्या सर्वाधिक १३२६ धावांचा विक्रम मोडण्यसाठी सूर्यकुमार यादवल २८६ धावा करायच्या आहेत.
पावसामुळे या सामन्यात व्यत्यय निर्माण झाला आहे आणि ११.३० ला होणारी नाणेफेक पुढे ढकलण्यात आली आहे. सध्यातरी तेथे मुसळधार पाऊस पडतोय... या वेळेत भारतीय खेळाडू किवींसोबत Football Volleyball खेळत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs New Zealand T20I live scorecard update : India Vs New Zealand toss has been delayed due to rain, both team players playing football volleyball, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.