India vs New Zealand T20I series: Live Scorecard - भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आजच्या दुसऱ्या लढतीवरही पावसाचे सावट होते. सध्या पाऊस थांबला असला तरी सकाळपासून येथे रिपरिप सुरू आहे आणि त्यामुळे खेळपट्टी कोणाला साथ देईल, याचा अंदाज बांधणे अवघड आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू अनुभवी न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- मागच्या वेळेत भारतीय संघाने ५-० अशा फरकाने न्यूझीलंडवर विजय मिळवला होता.
- ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेल्या १५ सदस्यांपैकी केवळ ८ जणंच या दौऱ्यावर आले आहेत
- एका वर्षात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोहम्मद रिझवानच्या सर्वाधिक १३२६ धावांचा विक्रम मोडण्यसाठी सूर्यकुमार यादवल २८६ धावा करायच्या आहेत.
- सूर्यकुमार यादवने २०२२ मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६० षटकार खेचले आहेत आणि त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीच्या मुहम्मद वसीम ( ४३) याचा क्रमांक येतो
- रिषभ पंतने ९७० धावा केल्या आहेत आणि ट्वेंटी-२०त १००० धावांचा टप्पा गाठण्यसाठी त्याला ३० धावांची गरज आहे. हा टप्पा ओलांडणारा तो ११वा भारतीय ठरणार आहे.
भारताचा संघ - इशान किशन, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज व युजवेंद्र चहल ( Kishan, Pant, Surya, Iyer, Hooda, Hardik, Sundar, Bhuvi, Arshdeep, Siraj and Chahal.)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs New Zealand T20I live scorecard update : New Zealand have won the toss and they've decided to bowl first, know team India Playing Xi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.