Join us  

IND vs NZ live T20I : संजू सॅमसनला डावलून Rishabh Pant ला संधी, पठ्ठ्या ६ धावा करून परतला माघारी; पावसाची एन्ट्री, Video 

भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आजच्या दुसऱ्या लढतीवरही पावसाचे सावट आहे.  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू अनुभवी न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 12:41 PM

Open in App

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - २०१६च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाची सलामीवीची जोडी इशान किशनरिषभ पंत आज सीनियर संघाकडून ओपनिंगला आली. इशानने मिळालेल्या संधीचं सोनं केलं, परंतु रिषभने ( Rishabh Pant) पुन्हा निराश केले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रिषभला संधी मिळाली नव्हती, परंतु इथे मिळालेल्या पहिल्याच संधीवर तो अपयशी ठरला. संजू सॅमसनला न खेळवल्याने चाहत्यांचा पारा चढला होता आणि त्यात रिषभच्या अपयशाने भर पडली. 

भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आजच्या दुसऱ्या लढतीवरही पावसाचे सावट आहे.  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू अनुभवी न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इशान किशन आणि रिषभ पंत ही २०१६ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील ओपनिंग जोडी आज सीनियर्स संघाकडून सलामीला आली. पण, इशान चुकीचे ग्लोव्ह्ज घेऊन मैदानावर आला अन् हे लक्षात येताच त्याने तातडीने त्याचे ग्लोव्ह्ज मागवले. टीम साऊदीच्या गोलंदाजीवर रिषभने खणखणीत चौकार खेचला.

तिसऱ्या षटकात साऊदीच्या गोलंदाजीवर स्लीप हटवली अन् इशानने हिच संधी साधताना लेट कट मारून चौकार मिळवला. ॲडम मिलनेने दुसऱ्या षटकात ८ धावा दिल्या आणि यात ७ अतिरिक्त धावा होत्या. लॉकी फर्ग्युसनचे स्वागत इशानने षटकाराने केले. पावसाचीही रिपरिप सुरू होती. पॉवर प्लेमधील अखेरच्या षटकात रिषभने ( ६) फटकेबाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु फर्ग्युसनच्या पहिल्याच चेंडूवर तो  झेलबाद झाला. टीम साऊदीने अप्रतिम रिटर्न कॅच घेताना भारताला ३६ धावांवर पहिला धक्का दिला. फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने आल्याआल्या फटकेबाजी केली, परंतु पावसाची एन्ट्री झाली. भारताने ६.४ षटकांत १ बाद ५० धावा केल्या आहेत. भारताचा संघ - इशान किशन, रिषभ पंत, सूर्यकुमार  यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज व युजवेंद्र चहल  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरिषभ पंतइशान किशनसंजू सॅमसन
Open in App