India vs New Zealand T20I series: Live Scorecard - सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) भारताच्या १९१ धावांपैकी १११ धावा चोपल्या. कॅलेंडर वर्षातील त्याचे हे ट्वेंटी-२०तील दुसरे शतक ठरले आणि रोहित शर्मा ( १०२८) याच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. सूर्याच्या या मेहनतीला गोलंदाजांचीही चांगली साथ मिळाली. भारतीय गोलंदाजांनीची कामगिरी उल्लेखनीय झाली आणि न्यूझीलंडला त्यांनी गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारताने हा सामना सहज जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
सूर्यकुमार यादवने ३२ चेंडूंत अर्धशतक झळकावले अन् पुढील १७ चेंडूंत वादळ आणले; पाहा Video
इशान किशन ( ३६) व रिषभ पंत ( ६) यांना सलामीला पाठवण्याचा प्रयोग फसला. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) पून्हा संकटमोचक ठरला. त्याने ४९ चेंडूंत ११ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने नाबाद १११ धावा चोपल्या. कर्णधार हार्दिक पांड्या ( १३) व श्रेयस अय्यर ( १३) यांनी सूर्यासोबत समाधानकारक भागीदारी केली. सूर्या व श्रेयस यांनी २१ चेंडूंत ३९ धावांची भागीदारी केली. हार्दिकने चौथ्या विकेटसाठी सूर्यासोबत ४० चेंडूंत ८४ धावांची भागीदारी केली. टीम साऊदीने अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेतली. हार्दिक, दीपक हुडा व वॉशिंग्टन सुंदरला त्याने बाद केले. भारताच्या एकूण धावसंख्येतील ६९ धावा या अन्य फलंदाजांच्या व ११ अतिरिक्त धावा आहेत.
न्यूझीलंडचा निम्मा संघ ८९ धावांवर माघारी परतला होता आणि त्यांना अखेरच्या ६ षटकांत विजयासाठी १०१ धावा करायच्या होत्या. केन हा एकमेव आशेचा किरण त्यांच्यासाठी मैदानावर होता. पण, भारतीय गोलंदाजा चांगली कामगिरी करत होते. युजवेंद्रने २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने १६व्या षटकात चार निर्धाव चेंडू टाकताना मिचेल सँटरनची विकेट घेऊन किवींच्या अडचणी वाढवल्या. केनने अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी केली, परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. केन ५२ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. हुडाने १९व्या षटकात ३ विकेट्स घेत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १२६ धावांत तंबूत पाठवला. हुडाने १० धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि भारताने ६५ धावांनी सामना जिंकला.