भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी कसोटी : न्यूझीलंड संघानं जगातील अव्वल कसोटी संघावर 2-0 असे निर्भेळ यश मिळवले. न्यूझीलंड संघानं फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडींवर टीम इंडियापेक्षा सरस कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी गमावल्यानंतर टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला होता. पण, ते इतक्या वाईट पद्धतीने पराभूत होतील, असे कोणालाही वाटले नव्हते. टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या डावात न्यूझीलंडसमोर 132 धावांचे माफक आव्हानच ठेवता आहे. टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल यांनी अर्धशतकी खेळी करताना न्यूझीलंडचा विजय पक्का केला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या कसोटी संघातील अव्वल स्थानही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार!
कालच्या 6 बाद 90 धावांवरून आजचा खेळ सुरू करणारा भारतीय संघ 124 धावांत तंबूत परतला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्यासमोर टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 132 धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांना खिंड लढवायची होती, परंतु तेही अपयशी ठरले. भारताच्या तळाच्या चार फलंदाजांना तिसऱ्या दिवशी केवळ 34 धावा जोडता आल्या. ट्रेंट बोल्टने चार आणि टीम साऊदीने ३ विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल यांनी पहिल्या विकेटसाठी भक्कम भागीदारी करताना टीम इंडियाचा पराभव निश्चित केला. लॅथमला 52 धावांवर उमेश यादवनं माघारी पाठवलं. त्यानंतर आलेला केन विलियम्सनही ( 5) लगेच बाद झाला. ब्लंडलने 55 धावांच्या खेळीत 8 चौकार व 1 षटकार खेचले. त्याला जसप्रीत बुमराहनं बाद केले. न्यूझीलंडने हा सामना 7 विकेट्स राखून जिंकला. न्यूझीलंडने ही मालिका जिंकून आयसीसी कसोटी क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
आयसीसी कसोटी क्रमवारी संघ गुणभारत 116न्यूझीलंड 110 ( दोन स्थानांची सुधारणा)ऑस्ट्रेलिया 108 ( एका स्थानाची घसरण) इंग्लंड 105 ( एका स्थानाची घसरण)दक्षिण आफ्रिका 98श्रीलंका 91पाकिस्तान 85वेस्ट इंडिज 81बांगलादेश 61अफगाणिस्तान 49
मालिकेतील अपयशानंतर विराट कोहली म्हणतो; सर्वोत्तम संघाकडून पराभूत झाल्याची खंत नाही, पण...
न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली
टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम