भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही विराट कोहलीच्या टीमनं बाजी मारली. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं 133 धावांचं माफक लक्ष्य सहज पार केले. टीम इंडियानं दुसरा सामना 7 विकेट्स राखून जिंकताना मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना 29 जानेवारीला हॅमिल्टन येथे होणार आहे. कर्णधार विराट कोहलीनं आजच्या विजयानंतर लगेचच तिसऱ्या सामन्यासाठीचा संघ जाहीर केला.
IND Vs NZ, 2nd T20I: भारताच्या विजयाचे हायलाईट्स, एका क्लिकवर
न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी न्यूझीलंडला दमदार सुरूवात करून दिली. पण, शार्दूल ठाकूर आणि शिवम दुबे यांनी या दोघांनाही माघारी पाठवले. त्यानंतर रवींद्र जडेजानं किवी कर्णधार केन विलियम्सन आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांना माघारी पाठवून धक्के दिले. त्यात जसप्रीत बुमराहनं टिच्चून मारा केला. त्यामुळे किवींना 20 षटकांत 5 बाद 132 धावा करता आल्या. जडेजानं 4 षटकांत 18 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. ठाकूर, दुबे आणि बुमराह यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( 8) आणि विराट कोहली ( 11) लगेच माघारी परतले. पण, लोकेश राहुलनं तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह 86 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यर 33चेंडूंत 1 चौकार व 3 षटकार खेचून 44 धावांवर माघारी परतला. लोकेश राहुल 50 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 57 धावांवर नाबाद राहिला. सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला, ''आमच्या गोलंदाजांची कामगिरी आज उल्लेखनीय झाली. गोलंदाजांनी उत्तम मारा करताना न्यूझीलंडच्या धावांवर लगाम लावला आणि आम्हाला तेच हवं होतं. त्यामुळे फलंदाजांवरील दडपण कमी झाले.''
तो पुढे म्हणाला,''रवींद्र जडेजाचं विशेष कौतुक करायला हवं. त्याला युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर आणि शिवम दुबे यांनी सुरेख साथ दिली. त्यामुळे या विजयी संघात काही बदल करण्याची सध्यातरी मला गरज वाटत नाही. तिसऱ्या सामन्यातही याच विजयी संघासह मैदानावर उतरू.''
असा असेल संघ - भारत - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
IND Vs NZ, 2nd T20I: विराट कोहलीचा 'सुपर' झेल, मोडला रोहित शर्माचा विक्रम
थरारक सामन्यात टीम इंडियाचा पराभव, न्यूझीलंडनं जिंकली मालिका
BCCIला इशारा देणाऱ्या पाकिस्तानचे घुमजाव; आता विचारतात असं कधी म्हणालो?
लै भारी... ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाची ट्वेंटी-20त 130 धावांची वादळी खेळी
देशातल्या सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचा शंभरावा वाढदिवस, सचिन तेंडुलकरनं घेतली खास भेट
IND Vs NZ, 2nd T20I: ...अन् विराट कोहलीवर आली तोंड लपवण्याची वेळ
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी युवराज सिंग, वासीम अक्रम एकत्र खेळणार!
खेळाडूंना मालामाल करणाऱ्या IPL मध्ये संघमालकांना 'केवढ्ढे' पैसे मिळतात माहित्येय?
Web Title: India vs New Zealand : Virat Kohli said Team India will not be looking to make any changes to the winning combination in the 3rd T20I
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.