वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट : भारतीय पुरुष व महिला क्रिकेट संघांना न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत पराभवाने सुरुवात करावी लागली. दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. महिला संघाच्या पराभवात मात्र महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाने पुन्हा एक विक्रमी खेळी केली. तिने स्वतःच्याच नावावर असलेला सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडला. या सामन्यात तिने 24 चेंडूंत अर्धशतक झळकावले. या सामन्यानंतर स्मृतीची 'Chahal TV' वर मुलाखात घेण्यात आली आणि त्यात तिनं धक्कादायक खुलासा केला. तिला विराट कोहली घालत असलेली 18 क्रमाकांची जर्सी नको होती..
आयसीसी महिला क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या स्मृतीने 'Chahal TV' वर मनमोकळ्या गप्पा मारल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत स्मृतीने तीन सामन्यांत 195 धावा केल्या. पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात तिने 58 धावांची खेळी केली. 'Chahal TV' वर तिला 7 क्रमांकाची जर्सी हवी होती, परंतु ती उपलब्ध नसल्यामुळे संघ व्यवस्थापनाने तिला 18 क्रमांकाची जर्सी घालण्यास सांगितली.
''मला 7 क्रमाकांची जर्सी हवी होती. शाळेत माझा रोल क्रमांक 7 होता, परंतु त्यानंतर मी याच क्रमांकाला प्राधान्य देऊ लागले. आमचे संघ व्यवस्थापक विकास सर यांनी मला 18 क्रमांकाची जर्सी दिली. विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सी घालतो, याची मला कल्पना होती,'' असे मानधना म्हणाली.
चौथ्या वन डे सामन्यात चहलने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याबाबत चहलने स्मृतीला विचारले, ती म्हणाली,''चौथ्या वन डे सामन्यातील तुझ्या फलंदाजीने मला खूप प्रेरणा मिळाली. मला माझ्या फलंदाजीत आणखी सुधारणा करावीशी वाटली."
पाहा संपूर्ण व्हिडीओ...
http://www.bcci.tv/videos/id/7303/world-no-1-batter-makes-her-debut-on-chahal-tv
Web Title: India vs New Zealand : Virat Kohli's No. 18 not Smriti Mandhana's first choice, women's cricket star wanted THIS number instead
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.