India vs New Zealand: जेव्हा धोनीने केदारला दिला मराठीत सल्ला... व्हिडीओ झाला वायरल

गोलंदाजी कशी करायची हा सल्ला धोनीने केदारला चक्क मराठीमध्ये दिला. या गोष्टीचा व्हिडीओ हा चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 08:46 PM2019-02-04T20:46:44+5:302019-02-04T20:47:25+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand: When ms Dhoni gave Kedar jadhav advice in Marathi ... Video became viral | India vs New Zealand: जेव्हा धोनीने केदारला दिला मराठीत सल्ला... व्हिडीओ झाला वायरल

India vs New Zealand: जेव्हा धोनीने केदारला दिला मराठीत सल्ला... व्हिडीओ झाला वायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड :  भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कधी काय करेल याचा काही नेम नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात केदार जाधवला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी नेमकी कशी गोलंदाजी करायची हा सल्ला धोनीने चक्क मराठीमध्ये दिला. या गोष्टीचा व्हिडीओ हा चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हा पाहा खास व्हिडीओ

तिशीपल्ल्याड धोनी यष्टिमागे अजूनही तितक्याच अचुकपणे व वेगाने भूमिका पार पाडत आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही ( आयसीसी) धोनीचा नाद करायचा नाय, असा सल्ला दिला आहे. आयसीसीचा हा ट्विट चांगलाच व्हायरल होत आहे.

महेंद्रसिंग धोनी हा अशक्यप्राय वाटणारी गोष्टही शक्य करू शकतो. या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात धोनीने कमाल केली. त्यानंतर चाहत्यांच्या ओठी आपसूकच आले अनहोनी को होनी कर दे महेंद्रसिंग धोनी... 

पाचव्या सामन्यात धोनीला फलंदाजीमध्ये फारशी चुणूक दाखवता आली नाही. पण यष्टीरक्षण करताना मात्र त्याने अद्भूत अशीच कामगिरी केली. भारतीय संघ पुन्हा एकदा अचडणीत सापडला असताना कर्णधार रोहित शर्माने केदार जाधवला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केले. केदारने 37व्या षटकात जेम्स निशामच्या विरोधात पायचीतचे अपील केले. यावेळी पंचांनी हे अपील फेटाळले. धोनीनेही सुरुवातीला अपील केले खरे, पण त्यानंतर तो चेंडू घेण्यासाठी धावला. धोनी चेंडूपर्यंत पोहोचत असताना न्यूझीलंडचे फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी धोनीने चतुराई दाखवली आणि चपळतेने चेंडू थेट यष्ट्यांवर फेकला. धोनीने नेमके काय आणि कसे केले हे कुणालाही कळले नाही. अखेर तिसऱ्या पंचांना विचारणे करण्यात आली आणि धोनीने निशामला रन आऊट केल्याचा निर्णय दिल्या. 

भारताच्या 253 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दमदार फलंदाजी करत होता. जर केन टिकला तर तो सामना जिंकवू शकतो, हे भारतीय संघाला माहिती होते. त्यामुळेच कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीमध्ये बदल केला आणि केदार जाधवच्या हाती चेंडू सुपूर्द केला. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केदारला अशा काही टिप्स दिल्या की, केनला तंबूचा रस्ता धरावा लागला.

Web Title: India vs New Zealand: When ms Dhoni gave Kedar jadhav advice in Marathi ... Video became viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.