भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला तिसरा ट्वेंटी-20 सामना आज हॅमिल्टन येथे होणार आहे. या सामन्यात विजयी हॅटट्रिक साजरी करून टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकही ट्वेंटी-20 मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाचा आजचा विजय हा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा असेल. त्यामुळे हातची आलेली संधी गमावण्यास कर्णधार विराट कोहलीही तयार नसेल. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी कोहली सर्वोत्तम संघ घेऊनच मैदानावर उतरणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत भारतानं उत्तम सांघिक खेळ केला. पहिल्या सामन्यात टीम इंडियानं सहा विकेट राखून सहज विजय मिळवला. 202 धावांचे लक्ष्य टीम इंडियानं सहज पार केले. कॉलीन मुन्रो, केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांच्या अर्धशतकी खेळाला टीम इंडियाकडून लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनीही अर्धशतक झळकावून प्रत्युत्तर दिले. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांना 132 धावांवर रोखले. रवींद्र जडेजानं चार षटकांत 18 धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर लोकेश आणि श्रेयस यांनी भारताला विजय मिळवून दिला.
या सामन्यानंतर कोहलीनं विजयी संघात बदल करणार नसल्याचे संकेत दिले होते. पण, शार्दूल ठाकूरच्या जागी नवदीप सैनीला आज मैदानावर उतरवले जाऊ शकते. हॅमिल्टनची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. त्यामुळे यजमानांच्या फलंदाजांना चकवण्यासाठी कोहली संघात सैनीला आणू शकतो.
असा असेल संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.
... तर आशिया कप खेळणार नाही, पाकच्या इशाऱ्याला बीसीसीआयचे जशासतसे उत्तर
IND Vs NZ : टीम इंडियाचा कसून सराव अन् रिषभ पंतचा आराम...
Video : महेंद्रसिंग धोनीच्या आठवणीत युजवेंद्र चहल भावूक, सांगितला 'कॉर्नर सीट' चा किस्सा