कर्णधार विराट कोहलीचा शतकी तडाखा; न्यूझीलंडला २८१ धावांचे आव्हान  

कर्णधार विराट कोहली (१२१) याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने खराब सुरुवातीनंतर पाहुण्या न्यूझीलंडविरुध्द पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५० षटकात ८ बाद २८० धावांची मजल मारली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 01:08 PM2017-10-22T13:08:05+5:302017-10-22T17:40:31+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand, winning the toss, Virat's decision of batting | कर्णधार विराट कोहलीचा शतकी तडाखा; न्यूझीलंडला २८१ धावांचे आव्हान  

कर्णधार विराट कोहलीचा शतकी तडाखा; न्यूझीलंडला २८१ धावांचे आव्हान  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- रोहित नाईक

मुंबई : कर्णधार विराट कोहली (१२१) याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने खराब सुरुवातीनंतर पाहुण्या न्यूझीलंडविरुध्द पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५० षटकात ८ बाद २८० धावांची मजल मारली.  वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने भेदक मारा करताना भारतीय फलंदाजीला हादरे देत ३५ धावांत ४ बळी घेतले.

कोहलीने कारकिर्दीतील विक्रमी ३१वे शतक झळकावताना भारताला आव्हानात्मक मजल मारुन दिली. वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा - शिखर धवन यांनी पहिल्या तीन षटकात चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, चौथ्या षटकामध्ये बोल्टने भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला. त्याने प्रथम धवन आणि त्यानंतर रोहित यांना बाद करुन यजमानांना जबर धक्के दिले. धवन १२ चेंडूत एका चौकारासह ९, तर रोहित १८ चेंडूत २ षटकारांसह २० धावा काढून परतला. रोहित चांगल्या लयीमध्ये दिसत होता, परंतु बोल्टच्या अचूकतेपुढे अंदाज चुकल्याने तो त्रिफळाचीत झाला. यावेळी भारताची ५.४ षटकात २ बाद २९ अशी अवस्था झाली.

यानंतर, कर्णधार कोहली आणि केदार जाधव यांनी भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी अत्यंत सावध पवित्रा घेतल्याने सलामी जोडी परतल्यानंतर पुढील ५ षटकात भारताने केवळ ८ धावा काढल्या. त्यात वैयक्तिक २९ धावांवर खेळत असलेल्या कोहलीला कॉलिन डि ग्रँडेहोमच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले. मिशेल सँटनरने सोडलेला कोहलीचा झेल न्यूझीलंडला पुढे चांगलाच महागात पडला. 

एकाबाजूने कोहली खंबीरपणे किल्ला लढवत असताना दुसºया टोकाकडून इतर फलंदाजांना फरशी चमक पाडता आली नाही. केदार जाधव (१२), दिनेश कार्तिक (३७), महेंद्रसिंग धोनी (२५) आणि हार्दिक पांड्या (१६) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. कोहली आणि कार्तिक यांनी चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करुन भरताची पडझड रोखली. अखेरच्या काही षटकांमध्ये भुवनेश्वर कुमारने दिलेल्या तडाख्यामुळे भारताला आव्हानात्मक मजल मारता आली. भुवनेश्वरने १५ चेंडूत २ चौकार व २ षटकारांसह २६ धावा चोपल्या.  न्यूझीलंडसाठी बोल्ट व्यतिरिक्त टिम साऊदीने ३ तर मिशेल सँटनरने १ बळी मिळवण्यात यश मिळवले.   

कोहलीचा तडाखा

कोहलीने कारकिर्दीतील ३१वे एकदिवसीय शतक झळकावताना सर्वाधिक शतक झळकावणा-या फलंदाजांच्या क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा ३० एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडला. त्याचवेळी अव्वल स्थानी असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांच्या जवळ पोहचण्यासाठी कोहलीला अजून बरीच मजल मारायची आहे.  

धावफलक :

रोहित शर्मा त्रि. गो. बोल्ट २०, शिखर धवन झे. लॅथम गो. बोल्ट ९, विराट कोहली झे. बोल्ट गो. साऊदी १२१, केदार जाधव झे. व गो. सँटनर १२, दिनेश कार्तिक झे. मुन्रो गो. साऊदी ३७, महेंद्रसिंग धोनी झे. गुप्टील गो. बोल्ट २५, हार्दिक पांड्या झे. विलियम्सन गो. बोल्ट १६, भुवनेश्वर कुमार झे. निकोल्स गो. साऊदी २६, कुलदीप यादव नाबाद ०. अवांतर - १४. एकूण : ५० षटकात ८ बाद २८० धावा.

गोलंदाजी : टिम साऊदी १०-०-७३-३, ट्रेंट बोल्ट १०-१-३५-४; अ‍ॅडम मिल्ने ९-०-६२-०; मिशेल सँटनर १०-०-४१-१; कॉलिन डि ग्रँडेहोम ४-०-२७-०; कॉलिन मुन्रो ७-०-३८-०.

Web Title: India vs New Zealand, winning the toss, Virat's decision of batting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.