मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जे चाहते हा सामना सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्यांच्यासाठी एक खूष खबर आहे. मँचेस्टरमध्ये सध्या पाऊस थांबला आहे. त्याचबरोबर सूर्यानेही दर्शन दिले आहे. पंचही सामन्याची पाहणी करत आहेत. त्यामुळे आता सामना किती वेळात सुरु होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
फक्त ही एक गोष्ट घडली की भारत अंतिम फेरीत पोहोचणारपावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना थांबवावा लागला आहे. आता काही वेळात पंच खेळपट्टीची पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतरच सामन्याबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. पण फक्त एक गोष्ट जर घडली, तर भारतीय संघ थेट अंतिम फेरीत पोहोचू शकतो.
मँचेस्टरमध्ये अजूनही पाऊस सुरु आहे. कव्हर्स काढण्यात आलेले नाहीत. पण जर आता डकवर्थ-लुईस नियम लावला गेला तर भारतासाठी महागात पडू शकते. कारण सध्या न्यूझीलंडची ४६.१ षटकांत ५ बाद २११ अशी स्थिती आहे. जर पावसामुळे न्यूझीलंडचा डाव थांबवण्यात आला आणि ४६ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तर भारताला २३७ धावांचे टार्गेट देण्यात येऊ शकते. त्यामुळे भारतासाठी हे धोकादायक ठरू शकते.
पावासामुळे जवळपास एक तासाचा खेळ वाया गेला आहे. अजूनही मैदानातील कव्हर्स काढण्यात आलेले नाही. त्यामुळे आता सामना होणार की नाही, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. आता पंच मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतर सामना कधी सुरु करायचा आणि किती षटकांचा खेळवायचा, हा निर्णय घेण्यात येईल. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पंच मैदानाची पाहणी करणार आहेत. त्यानंतरच सामना कधी खेळवायचा हा निर्णय घेण्यात येणार आहे.
हा सामना सुरु होणार की नाही, हे आपल्याला अर्ध्या तासात कळू शकते. पण जर हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला तर काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. पावसामुळे जरर सामना रद्द करावा लागला तर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्यामुळे आता चाहते वरुण राजाकडे हेच मागणे मागत असतील.