मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताचा विराट कोहली हा आक्रमक असल्याचे म्हटले जाते. पण मैदानात तो बऱ्याचदा वैतागलेला पाहायला मिळतो. न्यूझीलंडविरुद्ध भारताचा उपांत्य फेरीचा सामना सुरु आहे. या सामन्यात तरी कोहली मॅच्युअरपणे वागेल, असे वाटत होते. पण या सामन्यातही कोहली वैतागलेला पाहायला मिळाला.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात कोहली वैतागलेला पाहायला मिळाला. कारण पहिल्याच षटकात कोहलीने कोणालाही न जुमानता रीव्ह्यू घेतला. हा रीव्ह्यू चुकल्याचे पाहायला मिळाले आणि त्यानंतर कोहली स्वत:वरच वैतागल्याचे पाहायला मिळाले.
धोनीने रचला इतिहास; सचिननंतर ठरला फक्त दुसरा खेळाडूभारत आणि न्यूझीलंडच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक इतिहास रचला आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर धोनी हा विक्रम रचणार दुसरा फलंदाज ठरला आहे.
सचिनने आतापर्यंत क्रिकेट विश्वातील बरेच विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सचिनचे काही विक्रम विराट कोहलीने मोडले आहेत. पण आता तर धोनीने त्याच्या एका विक्रमाशी बरोबरी केली असून लवकर तो हा विक्रम मोडीत काढणार आहे. पण हा विक्रम आहे तरी काय...
भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. पण धोनीचा हा ३५०वा एकदिवसीय सामना आहे. त्यामुळे सचिननंतरचा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. धोनीने भारताकडून ३४७ सामने खेळले आहेत, त्याचबरोबर आशियाई इलेव्हनकडून धोनीने तीन सामने खेळले आहेत.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात टीम इंडियाने पहिल्या दहा षटकांत वर्चस्व गाजवले. जसप्रीत बुमराहनं दुसऱ्याच षटकात किवींना धक्का दिला. त्यानं मार्टिन गुप्तीलला दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार विराट कोहलीकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. पण, भारताची चिंता वाढवणारा प्रसंग या सामन्यात घडला. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं 16व्या षटकानंतर मैदान सोडले.
बुमराह व भुवनेश्वर कुमार यांच्या टिच्चून माऱ्यासमोर न्यूझीलंडला पहिल्या दहा षटकांत 1 बाद 27 धावा करता आल्या. भुवीनं पाच षटकांत 1 निर्धाव षटक टाकून 13 धावा दिल्या, तर बुमराहने 4 षटकांत 10 धावांत 1 विकेट घेतली. त्यात एक निर्धाव षटकही आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या पॉवर प्लेमधील ही निचांक धावसंख्या ठरली. भारताने याच स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध पहिल्या दहा षटकातं 1 बाद 28 धावा केल्या होत्या. पायाचे स्नायू ताणले गेल्यामुळे पांड्याला मैदान सोडावे लागले. 16 व्या षटकानंतर तो मैदानाबाहेर गेला. आता त्याची ही दुखापत किती गंभीर आहे हे लवकर कळेलच. पांड्याने 4 षटकांत 17 धावा दिल्या आहेत.