India Vs New Zealand World Cup Semi Final :  पाऊस भारतासाठी धोकादायक, मिळणार मोठ्ठं टार्गेट

जर पावसामुळे न्यूझीलंडचा डाव थांबवण्यात आला आणि ४६ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 07:31 PM2019-07-09T19:31:38+5:302019-07-09T19:33:03+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand World Cup Semi Final: Rain is dangerous for India, big target will be given... | India Vs New Zealand World Cup Semi Final :  पाऊस भारतासाठी धोकादायक, मिळणार मोठ्ठं टार्गेट

India Vs New Zealand World Cup Semi Final :  पाऊस भारतासाठी धोकादायक, मिळणार मोठ्ठं टार्गेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पावसाचा सामन्यावर नेमका काय परीणाम होणार, याचा विचार आता सारे चाहते करत असतील. पण पावसामुळे न्यूझीलंडचा डाव थांबवण्यात आला तर भारतासाठी हे धोकादायक ठरू शकते. कारण भारताला यावेळी नोठे टार्गेट मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

Related image

मँचेस्टरमध्ये अजूनही पाऊस सुरु आहे. कव्हर्स काढण्यात आलेले नाहीत. पण जर आता डकवर्थ-लुईस नियम लावला गेला तर भारतासाठी महागात पडू शकते. कारण सध्या न्यूझीलंडची ४६.१ षटकांत ५ बाद २११ अशी स्थिती आहे. जर पावसामुळे न्यूझीलंडचा डाव थांबवण्यात आला आणि ४६ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तर भारताला २३७ धावांचे टार्गेट देण्यात येऊ शकते. त्यामुळे भारतासाठी हे धोकादायक ठरू शकते.

Related image


उपांत्य सामन्यात व्यत्यय आल्यावर काय सांगतात आयसीसीचे नियम वाचा...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या लढतीत पाऊस पडला आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. जेव्हा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा न्यूझीलंडची ५ बाद २११ अशी स्थिती होती. पण जेव्हा सामन्यात व्यत्यय येतो, तेव्हा आयसीसीने काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहे. आयसीसीचे हे नियम नेमके आहेत तरी काय, ते जाणून घ्या...

Related image

उपांत्य फेरीत जर पाऊस पडला आणि पूर्ण दिवस सामना होऊ शकला नाही किंवा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर आज सामना झाला नाही तर उद्या हा सामना पुन्हा खेळवण्यात येऊ शकतो. पण राखीव दिवशी सामना नव्याने सुरु होणार नाही, तर आता जी सामन्याची स्थिती आहे त्यानुसारच राखीव दिवशी सामना सुरु होणार.

Image result for ind vs nz in odi

जर उपांत्य फेरीची लढत बरोबरीत सुटला तर कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होणार, हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. जर उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन्ही संघांच्या समान धावा झाल्या तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. यामध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी एक षटक देण्यात येईल. या सुपर ओव्हरमध्ये जो सामना जिंकेल, तो अंतिम फेरीत पोहोचेल.

पावसामुळे जर हा सामना रद्द करण्याची पाळी आली, तर दोन्ही संघांतील सामन्यात नेमके काय झाले हे पाहावे लागते. पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यामुळे या सामन्याचा निकाल महत्वाचा ठरत नाही. त्यामुळे आता उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर गुणतालिका पाहिली जाईल. गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा सामना चौथ्या स्थानावर आहे.त्यामुळे उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल. त्यामुळे हा सामना जर रद्द झाला तर त्यामध्ये न्यूझीलंडचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर भारताला घाबरण्याचे काहीच कारण नाही.

अंतिम सामना जर पावसामुळे रद्द करण्यात आला तर कोणता संघ विजेता ठरेल, हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण राखीव दिवशीही सामना झाला नाही तर विश्वचषक दोन्ही संघांना विभागून देण्यात येईल.

Web Title: India vs New Zealand World Cup Semi Final: Rain is dangerous for India, big target will be given...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.