Join us  

India Vs New Zealand World Cup Semi Final : ओल्ड ट्रॅफर्डवर अखेर सूर्याचं दर्शन, आता पडणार धावांचा पाऊस

India vs New Zealand World Cup Semi Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 2:30 PM

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजे आज खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात होईल. आज सूर्यानंही दर्शन दिलं असून दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कसून सरावही केला.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच्या हवामानाच्या अंदाजानुसार ओल्ड ट्रॅफर्डवर पाऊस पडण्याची शक्यता 0 ते 10 टक्केच आहे. ढगाळ वातावरण असेल, परंतु अधुनमधून सूर्याची कृपा होईल.  त्यामुळे हा सामना तेथील वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता)  सुरू होईल. सुरुवातीचे दोन तास लख्ख सुर्यप्रकाश असेल आणि त्यामुळे ग्राऊंड्समनला मैदान सुकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. पण, दुपारी 12 वाजता पाऊस येण्याची शक्यता आहे. 1 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण राहिल, पण पाऊस पडणार नाही. अधुनमधून तुरळक सरी बरसतील. पुन्हा सायंकाळी पाच वाजता पाऊस येण्याची शक्यता आहे.डकवर्थ लुईस नियमानुसार कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा झाला तर; सेहवागची फटकेबाजीपावसामुळे खेळ वाया गेल्यानंतर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनं सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे ट्विट केले.  त्यानं डकवर्थ लुईस नियमाची फिरकी घेताना लिहिले की,''पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना डकवर्थ लुईसकडून पगार दिला गेला तर, किती फायद्याचे ठरेल ना. HRचं यावर काय मत आहे?''  

सौरव गांगुली जेव्हा लक्ष्मण, तेंडुलकर, द्रविडला ट्रोल करतो...भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं समकालीन सहकारी खेळाडूंना ट्रोल केले. प्रतिस्पर्धी खेळाडूंना डिवचण्यासाठी संघातील खेळाडूंकडे विविध जबाबदारी सोपवत होतास का, या प्रश्नावर गांगुलीनं मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला,''माझ्यावेळी संघात बरेच जंटलमन खेळाडू होते. जर मी राहुल द्रविडला प्रतिस्पर्धी खेळाडूला डिवचण्यास सांगितलं असतं तर त्याने शांतपणे नकार दिला असता. व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला असता की, मी माझ्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करतो. सचिन तेंडुलकरला असे सांगितले असते तर मिड ऑनवर उभा असलेल्या सचिनने मिडविकेटवरील खेळाडूकडे ती जबाबदारी सोपवली असती. पण, स्वतः काही केलं नसतं. त्यामुळे संघात बरीच समस्या होती. ही जबाबदारी केवळ हरभजन सिंग आणि सौरव गांगुलीच पार पाडत होते. कारण, सरदारजीला मी काही सांगितले तरी तो करायचा.''  

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतन्यूझीलंड