Join us  

रोहित, विराटची शतके, भारताचे न्यूझीलंडसमोर 338 धावांचे आव्हान

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने फटकावलेल्या झंझावाती शतकांच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडसमोर  338 धावांचे आव्हान ठेवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 2:19 PM

Open in App

कानपूर - रोहित शर्मा आणि विराट कोहलीने फटकावलेल्या झंझावाती शतकांच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडसमोर  338 धावांचे आव्हान ठेवले आहे. सलामीवीर शिखर धवन बाद झाल्यावर रोहित आणि विराटने केलेली द्विशतकी भागीदारी आणि अखेरच्या षटकांमध्ये धोनी आणि केदार जाधवने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 50 षटकात 6 बाद337 धावा फटकावल्या.न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक वनडेत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन यांनी भारताच्या डावाला चांगली सुरुवात करून दिली आहे. मात्र, सातव्या षटकात टीम साऊदीने भारताला पहिला धक्का दिला. शिखर धवनला त्याने 14 धावांवर झेलबाद करून माघारी धाडले.  शिखर धवन बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी द्विशतकी भागीदारी करत भारताला सुस्थितीत नेले.  दरम्यान रोहित शर्माने आपले वनडे कारकीर्दीतील 15 वे शतक पूर्ण केले. दरम्यान, रोहित शर्मा 147 धावा काढून माघारी परतला. रोहित आणि कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 230 धावांची भागीदारी केली.  रोहित बाद झाल्यावर विराटने एकदिवसीय कारकीर्दीतील आपले 32 वे शतक पूर्ण केले. तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील 9 हजार धावांचा टप्पाही ओलांडला. फटकेबाज हार्दिक पांड्या आज चमक दाखवू शकला नाही. तो 8 धावा काढून बाद झाला. तर विराट कोहली शतक पूर्ण झाल्यावर 113 धावा काढून साऊदीची शिकार झाला. त्यानंतर माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (25) आणि केदार जाधव (18) यांनी फटकेबाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली.  

टॅग्स :क्रिकेट