Join us  

India vs Pak: भारत पाक मॅच फ्रीमध्ये पहा! Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मोफत मिळविण्याची ट्रिक, आताच ट्राय करा...

Disney+ Hotstar Subscription Free: भारत विरुद्ध पाकिस्तानचा हा सामना डिस्ने + हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केला जाईल. Flipkart Super Coin द्वारे तुम्ही हा सामना पाहू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 12:41 PM

Open in App

T20 World Cup 2022: आज भारत पाकिस्तानमध्ये हायव्होल्टेज मॅच आहे. थोड्याच वेळात ती सुरु होईल. परंतू, ही मॅच कुठे पहायची? घरात आता प्रत्येकाकडे इंटरनेट आहे, डीटीएच आहेच आहे. परंतू, मोबाईलमध्ये हॉटस्टार आहे का? Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसाठी ८९९ ते १४९९ रुपये मोजावे लागणार आहेत. असे असताना काही असे प्लॅन आहेत जे तुम्हाला आजच नाही तर वर्षभरासाठी Disney+ Hotstar फ्रीमध्ये पाहता येणार आहे. 

फ्लिपकार्टवरून...भारत विरुद्ध पाकिस्तानचा हा सामना डिस्ने + हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केला जाईल. Flipkart Super Coin द्वारे तुम्ही हा सामना पाहू शकता. जेव्हा तुम्ही फ्लिपकार्टवर नवीन उत्पादन खरेदी करता तेव्हा तुम्हाला सुपर कॉईन दिले जाते. तुम्ही अनेक ऑफर घेण्यासाठी याचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला 1499 Super Coin लागणार आहेत. फ्लिपकार्टवर जाऊन तुम्ही तिथे हॉटस्टारचा कोड मिळवा आणि हॉटस्टारच्या अॅपवर जाऊन तिथे तो अॅक्टिव्हेट करा. 

एअरटेलवरून...Airtel चे अनेक प्रीपेड प्लान Disney + Hotstar सह येतात. 3 महिने ते 1 वर्षाच्या वैधतेसाठी हे प्लॅन आहेत. यासाठी तुम्ही ३९९ रुपये, ८३९ रुपये, ४९९ रुपये, ५९९ रुपये किंवा ३३५९ रुपयांचे प्रीपेड प्लॅन घेऊ शकता. 

व्होडाफोन...Vi चे दोन प्रीपेड प्लॅन Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शनसह येतात. त्याची वैधता एक वर्ष आहे. हे प्लॅन 499 आणि 601 रुपयांचे आहेत.

जिओवरून...जिओने त्यांच्या अनेक प्लॅनमधून डिस्ने + हॉटस्टार सदस्यता काढून टाकली आहे. कंपनी केवळ Rs 1499 आणि Rs 4199 च्या प्रीपेड प्लॅनसह Disney + Hotstar मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App