India vs Pakistan Asia Cup 2022 : Asia Cup 2022 स्पर्धा २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान या लढतीने आशिया चषक २०२२ चा शुभारंभ होत असला तरी २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीची सर्वांना प्रतीक्षा आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर उभय संघ प्रथमच एकमेकांसमोर येणार आहेत. विराट कोहली, लोकेश राहुल हे दोन स्टार फलंदाज आशिया चषक स्पर्धेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा फॉर्म पाहता यंदा पाकिस्तानला विजय मिळवणे अवघड जाणार, असे जाणकारांचे मत आहे. बाबर आजमच्या ( Babar Azam) नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे.
पाकिस्तानचा माजी गोलंदाज तौसिफ अहमद ( Tauseef Ahmed) याने India vs Pakistan लढतीवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका केली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघावरूनही अहमदने नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानला आशिया चषकाची नव्हे तर फक्त भारताविरुद्ध विजय मिळवण्याची पडली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी आशिया चषक जिंकणे हे दुय्यम आहे, अशी टीका अहमदने केली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेत एकूण १४ सामने झाले आणि त्यात जय-पराजयाची आकडेवारी ही ८-५ अशी भारताच्या बाजूने आहे.
२८ ऑगस्टला होणाऱ्या लढतीपूर्वी अहमदने स्पोर्ट्स Paktvला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,''आपला सर्वोत्तम संघ आशिया चषक स्पर्धेत खेळावा असे आम्हाला वाटते. शोएब मलिकची निवड व्हायला पाहिजे होती, असे आपल्याला वाटतेय, कारण अशा स्पर्धेच्या वेळीच हे खेळाडू आपल्याला आठवतात. पण, आपल्याला खरंच आशिया चषकाशी घेणंदेणं नाही. आपण फक्त भारताविरुद्धच्या २-३ सामन्याचा विचार करतोय. हे असेच आहे. ते सामने जिंकले म्हणजे सर्व झाले. हे चूकीचे आहे.''
आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक
२७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
२८ ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध क्वालिफायर, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
१ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
३ सप्टेंबर - B1 विरुद्ध B2, Super 4, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
४ सप्टेंबर - A1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
६ सप्टेंबर - A1 विरुद्ध B1, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
७ सप्टेंबर - A2 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
८ सप्टेंबर- A1 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
९ सप्टेंबर - B1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
११ सप्टेंबर - अंतिम सामना, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
Web Title: India vs Pakistan Asia Cup 2022 : ‘We don’t care about Asia Cup, we only care about winning against India’ Pakistan cricketers Tauseef Ahmed blasts PCB
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.