Join us  

किशन ऑन मिशन! इशानने पाकिस्तानची झोप उडवली, MS Dhoniच्या १२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

भारतीय संघाने आघाडीचे ४ फलंदाज ६६ धावांवर गमावले असताना युवा फलंदाज इशान किशन ( Ishan Kishan) मैदानावर उतरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 6:20 PM

Open in App

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today :  भारतीय संघाने आघाडीचे ४ फलंदाज ६६ धावांवर गमावले असताना युवा फलंदाज इशान किशन ( Ishan Kishan) मैदानावर उतरला. पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफच्या बाऊन्सवर त्याने मारलेला अपर कट षटकार सारे पाहतच बसले होते. इशानने त्यानंतर संयम दाखवताना हार्दाक पांड्यासह इनिंग्ज बिल्ड केली आणि भारतीय चाहत्यांना आशा दाखवली. इशानने ५४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले अन् MS DHONI च्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली. ( India vs Pakistan Live  Scorecard )  

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा ( ११), विराट कोहली ( ४) व श्रेयस अय्यर ( १४) हे पहिल्या १० षटकांत माघारी परतले. पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरीस रौफ यांनी भारतीय संघाला धक्यांवर धक्के दिले. रोहित व विराट यांना पाकिस्तानी गोलंदाज शाहीनने त्रिफळाचीत केले. त्याने पहिल्या स्पेलमध्ये ५-२-२०-२ अशी बहारदार गोलंदाजी केली. पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरचा भर पटापट धावा करण्यावर होता. पण, हॅरीस रौफच्या बाऊन्सवर त्याने पुल मारला अन् मिड विकेटवर फखर झमानने अप्रतिम झेल घेतला. इशान किशनला १२ धावांवर नसीम शाहच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले. पण, गिलच्या ( १०) नशिबी जीवदान नव्हते अन् रौफच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजाचा त्रिफळा उडाला. भारताला ६६ धावांवर चौथा धक्का बसला.   India vs Pakistan Live Match 

इशान किशन व हार्दिक पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला. KL Rahulच्या जागी मिळालेल्या संधीचं इशाननं सोनं केलं अन् अर्धशतक झळकावून निवड समितीला फेरविचार करण्यास भाग पाडलं. ही जोडी तोडण्यासाठी शाहीनला पुन्हा बोलावण्यात आले, पण यावेळी तो अपयशी ठरला. वन डे क्रिकेटमध्ये सलग चार सामन्यात ५०+ धावा करणारा तो महेंद्रसिंग धोनीनंतर ( २०११) भारताचा पहिला यष्टिरक्षक-फलंदाज ठरला.  India vs Pakistan Live Asia Cup Match

टॅग्स :एशिया कप 2023इशान किशनभारत विरुद्ध पाकिस्तानहार्दिक पांड्यामहेंद्रसिंग धोनी
Open in App