Join us  

India vs Pakistan Live Scorecard : रोहितचा दुसऱ्याच चेंडूवर झेल टाकला; आफ्रिदी, बाबर यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला, Video

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : रोहित शर्मा ( Rohit Sharma) सकारात्मक खेळ करताना दिसतोय अन् शाहीन शाह आफ्रिदीने त्याचे यॉर्करने स्वागत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 3:22 PM

Open in App

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : रोहित शर्मा ( Rohit Sharma) सकारात्मक खेळ करताना दिसतोय अन् शाहीन शाह आफ्रिदीने त्याचे यॉर्करने स्वागत केले. भारत-पाकिस्तान सामन्यातील चुरस पहिल्या चेंडूपासूनच पाहायला मिळाली. पण, रोहितने दुसरा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवला अन् चौकाराने खाते उघडले. फखर जमानला तो झेल घेता आला असता, परंतु त्याने खूप उशीरा डाईव्ह मारली. हिटमॅनची विकेट मिळता मिळता राहिल्याने शाहीनसह कर्णधार बाबर आजमचा चेहरा पाहण्यासारखा झाला. India vs Pakistan Live Match 

भारतीय संघाने खूप मोठी चूक केलीय! Guatam Gambhir ने तिखट शब्दांत टीम इंडियाचे कान टोचले

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद शमीला ( Mohammad Shami ) प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले अन् हा निर्णय सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता. अपेक्षेप्रमाणे लोकेश राहुलच्या जागी इशान किशनला संधी मिळाली. अतिरिक्त फलंदाज म्हणून शार्दूल ठाकूरला संधी दिली गेली. रोहित शर्मा व शुबमन गिल हे सलामीला कायम दिसतील. इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्याचा निर्णय झालेला दिसतोय अन् अशात विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा हे अष्टपैलू संघात आहेतच.  ( India vs Pakistan Live  Scorecard ) 

भारताकडून सर्वाधिक ८ आशिया चषक खेळण्याचा विक्रम रोहितने आज नावावर केला. रवींद्र जडेजाची ही ७ वी आशिया चषक स्पर्धा आहे.  या दोघांनी विराट कोहली ( ६), सचिन तेंडुलकर ( ६), महेंद्रसिंग धोनी ( ५) व मोहम्मद अझरुद्दीन ( ५) यांना मागे टाकले. रोहितने पहिल्या षटकात शाहीनचा दुसराच चेंडू चौकार खेचला, परंतु फखर झमानने झेल टिपण्याची संधी गमावली. तिसऱ्या षटकात रोहितने खणखणीत चौकार खेचला. रोहितने हाही चौकार स्क्वेअर लेगवर खेचला, परंतु यावेळी तो उंचावरून मारला.  India vs Pakistan Live Asia Cup Match

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्मा
Open in App