India vs Pakistan Live Scorecard : खेळ मांडला! भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाची एन्ट्री, समोर आले महत्त्वाचे अपडेट्स, Video

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 03:45 PM2023-09-02T15:45:32+5:302023-09-02T15:46:20+5:30

whatsapp join usJoin us
india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Good news: Rain stopped & covers are getting removed,INDIA 15-0 (4.2) Video | India vs Pakistan Live Scorecard : खेळ मांडला! भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाची एन्ट्री, समोर आले महत्त्वाचे अपडेट्स, Video

India vs Pakistan Live Scorecard : खेळ मांडला! भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाची एन्ट्री, समोर आले महत्त्वाचे अपडेट्स, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा ( Rohit Sharma) सकारात्मक खेळ करताना दिसला. शाहीन शाह आफ्रिदीने त्याचे यॉर्करने स्वागत केले. पण, रोहितने दुसरा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवला अन् चौकाराने खाते उघडले. फखर जमानला तो झेल घेता आला असता, परंतु त्याने खूप उशीरा डाईव्ह मारली. हिटमॅनची विकेट मिळता मिळता राहिल्याने शाहीनसह कर्णधार बाबर आजमचा चेहरा पाहण्यासारखा झाला. पण, पावसामुळे चाहत्यांच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले होते. India vs Pakistan Live Match 

रोहितचा दुसऱ्याच चेंडूवर झेल टाकला; आफ्रिदी, बाबर यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला, Video


 भारताकडून सर्वाधिक ८ आशिया चषक खेळण्याचा विक्रम रोहितने आज नावावर केला. रवींद्र जडेजाची ही ७ वी आशिया चषक स्पर्धा आहे.  या दोघांनी विराट कोहली ( ६), सचिन तेंडुलकर ( ६), महेंद्रसिंग धोनी ( ५) व मोहम्मद अझरुद्दीन ( ५) यांना मागे टाकले. रोहितने पहिल्या षटकात शाहीनचा दुसराच चेंडू चौकार खेचला, परंतु फखर झमानने झेल टिपण्याची संधी गमावली. तिसऱ्या षटकात रोहितने खणखणीत चौकार खेचला. रोहितने हाही चौकार स्क्वेअर लेगवर खेचला, परंतु यावेळी तो उंचावरून मारला.  ( India vs Pakistan Live  Scorecard )   

४.२ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाच्या जोरदार सरी आल्या अन् खेळाडूंना मैदान सोडावे लागले. ग्राऊंड्समन्सना संपूर्ण मैदान झाकावे लागले आहे. मात्र हाती आलेल्या वृत्तानुसार पाऊस थांबला आहे आणि कव्हर्स हटवण्याचं काम सुरू झालं आहे. आता खेळपट्टीची पाहणी करून पुन्हा मॅच कधी सुरू करायची याचा निर्णय घेतला जाईल. 


Web Title: india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Good news: Rain stopped & covers are getting removed,INDIA 15-0 (4.2) Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.