Join us  

India vs Pakistan Live Scorecard : भारताचे १,२,३ ठरले! नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार, पण मोहम्मद शमी नाही खेळणार

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : India vs Pakistan यांच्यातला हाय व्होल्टेज सामना Pallekele येथे खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 2:37 PM

Open in App

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : India vs Pakistan यांच्यातला हाय व्होल्टेज सामना Pallekele येथे खेळवला जाणार आहे. काल दोन्ही संघांतील खेळाडूनंनी मैदानावर कसून सराव केला.  विराट कोहली, रोहित शर्मा यांनी पाकिस्तानी खेळाडूंशी गप्पाही मारल्या. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीत पडतोय. पण, मनात एक धाकधुक होतीच आणि ती म्हणजे मॅच कधी सुरू होईल. दोन वाजत्याच्या सुमारास मैदानावरील कव्हर्स काढले गेले आणि दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर सरावाला लागले आहेत. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. India vs Pakistan Live

  • विराट कोहली वन डे क्रिकेटमध्ये १३००० धावा करण्यापासून १०२ धावा दूर आहे. त्याने आज शतकी खेळी केल्यास तो २६६ इनिंग्जमध्ये सर्वात जलद १३००० धावा करणारा फलंदाज ठरले. सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर ( ३२१ इनिंग्ज) हा विक्रम आहे. India vs Pakistan Live Match  
  • बाबर आजमने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी १०२ इनिंग्जमध्ये १९ शतकं झळकावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. आजही त्याने शतक झळकावले तर पाकिस्तानकडून सर्वाधिक २० शतकांच्या सईद अन्वरच्या विक्रमाशी तो बरोबरी करेल.
  • इमाम-उल-हक याला वन डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ३००० धावा करण्याऱ्या दुसऱ्या फलंदाजाचा मान मिळू शकतो. त्याच्या नावावर ६३ इनिंग्जमध्ये २८८९ धावा आहेत. शे होप व फखर जमान यांनी ६७ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडून संयुक्तपणे अव्वल स्थान टिकवले आहे. India vs Pakistan Live Asia Cup Match
  • रवींद्र जडेजाला वन डे क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ६ विकेट्सची गरज आहे आणि तो हा पल्ला ओलांडणारा सातवा भारतीय गोलंदाज ठरेल. पण, कपिल देव यांच्यानंतर ( ३७८३ धावा व २५३ विकेट्स) २०००+ धावा अन् २००+ विकेट्स घेणारा पहिला भारतीय ठरेल.  ( India vs Pakistan Live  Scorecard

 

अपेक्षेप्रमाणे लोकेश राहुलच्या जागी इशान किशनला संधी मिळाली, परंतु मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान नाही मिळाले. अतिरिक्त फलंदाज म्हणून शार्दूल ठाकूरला संधी दिली गेली. रोहित शर्मा व शुबमन गिल हे सलामीला कायम दिसतील. इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्याचा निर्णय झालेला दिसतोय अन् अशात विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल.

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानमोहम्मद शामी
Open in App