India vs Pakistan Live Scorecard : इशान किशन, हार्दिक पांड्या यांनी पाकिस्तानला बेक्कार चोपले; पण, इतरांनी पाणी फिरवले 

 रोहित शर्मा ( ११), विराट कोहली ( ४) व श्रेयस अय्यर ( १४) हे पहिल्या १० षटकांत माघारी परतले. पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरीस रौफ यांनी भारतीय संघाला धक्यांवर धक्के दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 07:47 PM2023-09-02T19:47:09+5:302023-09-02T19:47:40+5:30

whatsapp join usJoin us
india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Ishan Kishan 82 (81) & Hardik pandya 87 (90), India bowled out for 266 | India vs Pakistan Live Scorecard : इशान किशन, हार्दिक पांड्या यांनी पाकिस्तानला बेक्कार चोपले; पण, इतरांनी पाणी फिरवले 

India vs Pakistan Live Scorecard : इशान किशन, हार्दिक पांड्या यांनी पाकिस्तानला बेक्कार चोपले; पण, इतरांनी पाणी फिरवले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : इशान किशनने ( Ishan Kishan) आज बाजी मारली. रोहित, विराट, शुबमन, श्रेयस हे अनुभवी फलंदाज लवकर माघारी परतल्यामुळे इशानने खांद्यावर जबाबदारी घेतली अन् पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. त्याने हार्दिक पांड्यासह पाचव्या विकेटसाठी विक्रमी १३८ धावा जोडल्या. हार्दिकनेही दमदार फटकेबाजी करून पाकिस्तानसमोर आव्हान उभे केले. पण, हार्दिकच्या विकेटनंतर भारताने ३ धावांत दोन विकेट्स गमावल्या. भारतीय संघ तीनशेपार जाईल असे वाटत असताना पाकिस्तानी गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केलेच. India vs Pakistan Live Updates


 रोहित शर्मा ( ११), विराट कोहली ( ४) व श्रेयस अय्यर ( १४) हे पहिल्या १० षटकांत माघारी परतले. पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरीस रौफ यांनी भारतीय संघाला धक्यांवर धक्के दिले. शुबमन गिलच्या ( १०)  मागे अपयश कायम राहिले. इशान हा पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच वन डे सामन्यात ५०+ धावा करणारा नववा भारतीय फलंदाज ठरला. पण, युवराज सिंगनंतरचा पहिलाच डावखुरा फलंदाज बनला. पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणात नंतर ढिसाळपणा आलेला दिसला. हॅरिसने ही भागीदारी तोडली अन् इशान ८१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ८२ धावांवर झेलबाद झाला. हार्दिकसह त्याने १४१ चेंडूंत १३८ धावांची भागीदारी केली. India vs Pakistan Live, India vs Pakistan Live Match 


हार्दिकने नंतर हात मोकळे केले अन् चौकार खेचले. सामना पाकिस्तानच्या हातून निसटत होता अन् बाबर आजमचे टेंशन वाढत गेले. पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी आज २१ षटकांत ६.३३च्या सरासरीने एकही विकेट न घेता १३३ धावा दिल्या आणि त्या महागात पडल्या. शाहीनने यावेळी स्लोव्हर चेंडू टाकून हार्दिकला बाद केले. हार्दिक ९० चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ८७ धावांवर माघारी परतला. शाहीनने त्या षटकात रवींद्र जडेजा ( १४) याचीही विकेट घेतली. पुढे हॅरीसने शार्दूल ठाकूरला ( ३) माघारी पाठवले. आता भारताच्या हातून सामना निसटला.

जसप्रीत बुमराहने ४६व्या षटकात शाहीनला मिड ऑफच्या दिशेने टोलावलेला चेंडू लाजवाब होता. बुमराहने काही सुरेख फटके मारून भारताच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. शाहीनने १०-२-३५-४ अशी स्पेल टाकली. नसीमने ३६ धावांत ३ विकेट्स घेत भारताचा संपूर्ण संघ ४८.५ षटकांत २६६ धावांत तंबूत पाठवला. जसप्रीतने १६ धावा केल्या India vs Pakistan Live Asia Cup Match

Web Title: india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Ishan Kishan 82 (81) & Hardik pandya 87 (90), India bowled out for 266

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.