Join us  

India vs Pakistan Live Scorecard : भारतीय संघाने खूप मोठी चूक केलीय! Guatam Gambhir ने तिखट शब्दांत टीम इंडियाचे कान टोचले

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : India vs Pakistan यांच्यातला हाय व्होल्टेज सामना Pallekele येथे खेळवला जाणार आणि भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 2:53 PM

Open in App

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : India vs Pakistan यांच्यातला हाय व्होल्टेज सामना Pallekele येथे खेळवला जाणार आणि भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  २ वाजत्याच्या सुमारास मैदानावरील कव्हर्स काढले गेले आणि दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर सरावाला लागले आहेत. भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली असली तरी त्यांनी अतिरिक्त फलंदाज खेळवता यावा यासाठी मोहम्मद शमीला ( Mohammad Shami ) प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले अन् हा निर्णय सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता. माजी सलामीवीर गौतम गंभीर व संजय मांजरेकर यांनी तिखट शब्दात टीका केली. ( India vs Pakistan Live  Scorecard ) अपेक्षेप्रमाणे लोकेश राहुलच्या जागी इशान किशनला संधी मिळाली, परंतु मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान नाही मिळाले. अतिरिक्त फलंदाज म्हणून शार्दूल ठाकूरला संधी दिली गेली. रोहित शर्मा व शुबमन गिल हे सलामीला कायम दिसतील. इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्याचा निर्णय झालेला दिसतोय अन् अशात विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. अतिरिक्त फलंदाज म्हणून शार्दूलला ठेवण्यात आले असले तरी संघाकडे हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा हे अष्टपैलू संघात असताना शमीला बसवण्याचा निर्णय न पटणारा आहे.  IND Vs PAK Live Match Today :  

संजय मांजरेकर म्हणाले,''पाकिस्तानच्या गोलंदाजांवर मोहम्मद शमी जी दहशत निर्माण करू शकत होता, तशी शार्दूल ठाकूर करू शकरणार नाही. तुम्ही फलंदाजांच्या फळीबाबत बोलता, परंतु गोलंदाजांची फळीही तितकिच महत्त्वाची आहे.'' गौतम गंभीरने जोरदार टीका केली. तो म्हणाला,''मी माझ्या गोलंदाजाच्या फळीत कधीच तडजोड केली नसती. आपल्याला ८व्या क्रमांकाच्या गोलंदाजाने विजय मिळवून दिला आहे, असं किती वेळा घडलंय? त्यात शमी सारख्या गोलंदाजाला बाहेर करणं?''

 

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानमोहम्मद शामीगौतम गंभीर
Open in App