India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारताची इनिंग्ज संपल्यानंतर जोरदार पावसाची सुरूवात झाली आणि आता तर संपूर्ण मैदान झाकण्यात आलं आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास षटकं कमी होतील आणि त्यानुसार पाकिस्तानसमोरील लक्ष्यही बदलले. ८.२१ वाजल्यानंतर षटकं कमी होण्यास सुरुवात झाली आणि त्यानुसार पाकिस्तानच्या डावातील १४ षटकं कमी झाली अन् त्यांच्यासमोर सुधारित लक्ष्य ठेवलं गेलं.
रोहित शर्मा ( ११), विराट कोहली ( ४), श्रेयस अय्यर ( १४) व शुबमन गिल ( १०) हे अपयशी ठरले. इशानने ८१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ८२ धावा, तर हार्दिकने ९० चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ८७ धावा केल्या. या दोघांनी १३८ धावांची भागीदारी केली आणि पाकिस्तानविरुद्ध पाचव्या किंवा त्या खालच्या क्रमांकासाठीची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. रवींद्र जडेजा ( १४), शार्दूल ठाकूर ( ३) या अतिरिक्त फलंदाज म्हणून खेळवलेल्या खेळाडूंनी निराश केले. शाहीनने १०-२-३५-४ अशी स्पेल टाकली. नसीमने ३६ धावांत ३ विकेट्स घेत भारताचा संपूर्ण संघ ४८.५ षटकांत २६६ धावांत तंबूत पाठवला. जसप्रीतने १६ धावा केल्या. India vs Pakistan Live Asia Cup Match
भारताच्या डावानंतर जोरदार पाऊस सुरू झाला आणि संपूर्ण स्टेडियम कव्हर्सने झाकले गेले. ९ वाजता पावसाने विश्रांती घेतली अन् सामनाधिकारी मैदानाची पाहणी करायला पोहोचले. भारतीय खेळाडूही लगेच वॉर्म अप करण्यासाठी मैदानावर आले. पाकिस्तानसमोर ३६ षटकांत २२६ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले, परंतु पुन्हा पावसाच्या हजेरीमुळे मैदान झाकावे लागले. आणखी षटकं कमी झाल्यास पाकिस्तानसमोर २० षटकांत १५५ किंवा २५ षटकांत १८० धावांचे लक्ष्य ठेवले जाईल.
Web Title: india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Pakistan need 226 in 36 overs to defeat India, but raining again
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.