India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारत- पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक स्पर्धेतील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले गेले. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळविरुद्ध विजय मिळवल्याने त्यांच्या खात्यात ३ गुण झाले आहेत आणि अ गटातून Super 4 मध्ये प्रवेश करणारा तो पहिला संघ ठरला. या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने ( Shaheen Shah Afridi) ४ विकेट्स घेतल्या. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विकेट्सचा समावेश होता. या दोघांनाही त्याने क्लील बोल्ड केले. त्यानंतर शाहीनने सांगितले की, कोहलीपेक्षा रोहितला गोलंदाजी करण्यात जास्त मजा आली. India vs Pakistan Live
कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा पाकिस्तानचा घातक वेगवान गोलंदाज शाहीनने घेतला. शाहीनने डावाच्या पाचव्या षटकात येणाऱ्या चेंडूवर रोहितला चकवत क्लीन बोल्ड केले. रोहितने २२ चेंडूंत २ चौकारांसह ११ धावा केल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटला डावाच्या सातव्या षटकात शाहीनने माघारी पाठवले. शाहीनच्या बाहेर जाणार्या चेंडूवर कोहलीने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या बॅटच्या आतील कडा घेत यष्टींवर आदळला. India vs Pakistan Live Match
शाहीनला सामन्यानंतर रोहित आणि कोहलीच्या क्लीन बोल्ड बाबत विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की, रोहित आणि विराट या दोघांच्या विकेट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. पण रोहितला क्लीन बोल्ड करण्याचा जास्त आनंद घेतला. मला वाटते की नवीन चेंडू खूप चांगला स्विंग आणि सीमिंग करत होता. आमची योजना कामी आली. नसीम ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करत होता आणि यामुळे मी खूप आनंदी आहे.India vs Pakistan Live Scorecardभारताने उभ्या केल्या २६६ धावा टीम इंडियाने ६६ धावांवर ४ विकेट गमावल्यानंतर इशान किशन ( ८२ धावा) आणि हार्दिक पंड्या ( ८७ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर सन्मानजनक धावसंख्या गाठली. भारताने ४८.५ षटकांत सर्वबाद २६६ धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीनने ३५ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय नसीम शाह आणि हरिस रौफ यांनीही प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. India vs Pakistan Live Asia Cup Match