India vs Pakistan Live Scorecard : शाहिन आफ्रिदीने सापळा रचला, रोहित शर्मा अन् विराट कोहलीचा 'दांडा' उडवला; Video

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 04:10 PM2023-09-02T16:10:20+5:302023-09-02T16:11:51+5:30

whatsapp join usJoin us
india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Shaheen Afridi gets Rohit Sharma and Virat Kohli early right after the rain break, Video | India vs Pakistan Live Scorecard : शाहिन आफ्रिदीने सापळा रचला, रोहित शर्मा अन् विराट कोहलीचा 'दांडा' उडवला; Video

India vs Pakistan Live Scorecard : शाहिन आफ्रिदीने सापळा रचला, रोहित शर्मा अन् विराट कोहलीचा 'दांडा' उडवला; Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने ( Rohit Sharma) स्क्वेअर लेगच्या दिशेने दोन चौकार खेचून चाहत्यांना आनंदीत केले. पण, पावसामुळे २०-२५ मिनिटे सामना थांबवावा लागला. पावसाच्या विश्रांतीनंतर मॅच पुन्हा सुरू झाली आणि त्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने ( Shaheen Afridi) सापळा रचून हिटमॅनची दांडी गुल केली. शाहिनची गोलंदाजी पाहून विराट कोहली आश्चर्यचकित झाला.  India vs Pakistan Live Match 


 भारताकडून सर्वाधिक ८ आशिया चषक खेळण्याचा विक्रम रोहितने आज नावावर केला. रोहितला दुसऱ्या चेंडूवर स्क्वेअर लेगवर फखर झमानने जीवदान दिले. ४.२ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाच्या जोरदार सरी आल्या अन् खेळाडूंना मैदान सोडावे लागले. ग्राऊंड्समन्सना संपूर्ण मैदान झाकावे लागले आहे. मात्र हाती आलेल्या वृत्तानुसार पाऊस थांबला आहे आणि कव्हर्स हटवण्याचं काम सुरू झालं आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर शाहिनने पहिले ३  चेंडू चांगले स्विंग केले अन् त्याने चौथ्या चेंडूवर रोहितचा ( ११) त्रिफळा उडवला. या विकेटपूर्वी शाहिनने पहिले दोन चेंडू आऊट स्विंगर टाकले अन् त्यानंतर पुढचा चेंडू जरा आत फिरवला अन् रोहितचा त्रिफळा उडवला.   ( India vs Pakistan Live  Scorecard )  



शाहिनची गोलंदाजी पाहून विराट डग आऊटमध्ये असतानाच आश्चर्यचकित झाला होता. प्रत्यक्षातही पाकिस्तानी गोलंदाजाने त्य़ाला चकित केले. शाहिनच्या चेंडूने बॅटची किनाय घेत यष्टिंचा वेध घेतला अन् विराटला ४ धावांवर माघारी परतावे लागले. भारताने २७ धावांवर दोन विकेट्स गमावल्या. India vs Pakistan Live Asia Cup Match
 

Web Title: india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Shaheen Afridi gets Rohit Sharma and Virat Kohli early right after the rain break, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.