India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या आशिया चषक स्पर्धेतील आजच्या सामन्यातील पहिल्या डावाची विभागणी तीन टप्प्यात करता येईल. शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांनी ४ फलंदाज ६६ धावांवर माघारी पाठवले अन् भारताला बॅकफूटवर फेकले. पण, मधल्या षटकांत हार्दिक पांड्या व इशान किशन यांच्या भागीदारीने भारताला सामन्यात परत आणले. पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी २१ षटकांत एकही विकेट न घेता १३३ धावा दिल्या. मात्र, अखेरच्या टप्प्यात इशान व हार्दिक यांच्या विकेट जलदगती गोलंदाजांनी काढल्या अन् भारताला २६६ धावांवर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या जलदगती गोलंदाजांनी २७.५ षटकांत २ निर्धाव षटकांसह १२९ धावा देत १० विकेट्स घेतल्या. ( India vs Pakistan Live Scorecard )
इशान किशन ( ८२) आणि हार्दिक पांड्या ( ८७) यांच्या १३८ धावांच्या भागीदारीने भारताला सामन्यात पुनरागमन करू दिले. पण, या दोघांच्या विकेट्स पडल्या अन् पाकिस्तानला पुन्हा डोकं वर काढण्याची संधी मिळाली. रोहित शर्मा ( ११), विराट कोहली ( ४) व श्रेयस अय्यर ( १४) हे पहिल्या १० षटकांत माघारी परतले. शुबमन गिल ( १०) पुन्हा अपयशी ठरला. इशान ८१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ८२ धावांवर झेलबाद झाला. पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी आज २१ षटकांत ६.३३च्या सरासरीने एकही विकेट न घेता १३३ धावा दिल्या आणि त्या महागात पडल्या.हार्दिक ९० चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ८७ धावांवर माघारी परतला. रवींद्र जडेजा ( १४), शार्दूल ठाकूर ( ३) या अतिरिक्त फलंदाज म्हणून खेळवलेल्या खेळाडूंनी निराश केले. शाहीनने १०-२-३५-४ अशी स्पेल टाकली. नसीमने ३६ धावांत ३ विकेट्स घेत भारताचा संपूर्ण संघ ४८.५ षटकांत २६६ धावांत तंबूत पाठवला. जसप्रीतने १६ धावा केल्या. India vs Pakistan Live Asia Cup Match
पाकिस्तानच्या या उल्लेखनीय कामगिरीचं माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) कौतुक केले. शाहिदने आधी ट्विट करून जावई शाहीनचे कौतुक केले. त्यानंतर त्याने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, पाकिस्तानच्या जलदगती गोलंदाजांनी सुरुवातीच्या विकेट्स घेत संघाला प्रभावी सुरूवात करून दिली. इशान किशन व हार्दिक पांड्या यांच्या भागीदारीलाही सलाम... परंतु त्यानंतर गोलंदाजांनी पुन्हा एकजूटीने मारा करून भारताला २६६ धावांवर रोखले. आता फलंदाजांनवर सर्व जबाबदारी आहे.