Join us  

पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारतीय संघ का अडखळतोय? शुबमन गिलने सांगितलं धक्कादायक कारण

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी  भारतीय फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill) याने भारतीय फलंदाजांच्या अपयशाबाबत मोठे विधान केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 5:57 PM

Open in App

India vs Pakistan, Asia Cup 2023: आशिया चषकाच्या सुपर ४ मधील कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी  भारतीय फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill) याने भारतीय फलंदाजांच्या अपयशाबाबत मोठे विधान केले. पाकिस्तानसारख्या दर्जेदार गोलंदाजांचा सामना भारतीय संघ कधीच करत नाही आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध संघर्ष करावा लागत असल्याचे तो म्हणाला. आशिया चषकाच्या सुपर ४मध्ये रविवारी कोलंबो येथे भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. 

हा तर निर्लज्जपणा...! IND vs PAK राखीव दिवसावरून भारतीय खेळाडूचा Jay Shah यांच्यावर निशाणा

पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीविरुद्ध भारताच्या संघर्षांबद्दल बोलताना गिलने सांगितले, "जेव्हा तुम्ही या स्तरावर खेळत असता, तेव्हा तुमच्या कारकिर्दीच्या काही टप्प्यावर तुम्ही डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळलेले असता, आमचं तसं नाही होत. इतर संघांच्या तुलनेत आम्ही पाकिस्तानविरुद्ध फार खेळत नाही. त्यांच्याकडे दर्जेदार गोलंदाजी आक्रमण आहे. जेव्हा तुम्ही अशा गोलंदाजीचा वारंवार सामना करत नाही आणि त्याची सवय नसते तेव्हा फरक पडतो."

तो आणि कर्णधार रोहित शर्मा किती विरोधाभासी आहेत याबद्दल बोलताना गिल म्हणाला की, "मला पॉवरप्लेमध्ये ग्राउंडवर खेळायला आवडते. रोहित गोलंदाजांना मोठे फटके मारतो. हे संयोजन आमच्यासाठी चांगले आहे. खेळाडू म्हणून आम्ही किती वेगळे आहोत त्यामुळे गोलंदाजांना आम्हाला रोखणे कठीण होते."

  पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमची फलंदाजी तुम्ही पाहता का आणि त्याचे अनुसरण करतात का, असा प्रश्न विचारला असता, गिलने सहमती दर्शवली आणि बाबरला "वर्ल्ड-क्लास प्लेयर" म्हणून संबोधले. "होय, नक्कीच आम्ही त्याला फॉलो करतो. जेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत असतो. तो इतका चांगला का करतोय, त्यांची खासियत काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण त्याच्याकडे पाहतो. बाबरच्या बाबतीतही तेच आहे. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि आम्ही सर्वजण त्याचे कौतुक करतो," असे गिल म्हणाला. 

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानशुभमन गिल
Open in App