आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया पहिल्याच सामन्यात प्रचंड दडपणाखाली असेल, असे मत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं व्यक्त केलं आहे. भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी २४ ऑक्टोबरला एकमेकांविरुद्ध खेळून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या मोहिमेची सुरूवात करणार आहे. या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभूत करण्यास आवडेल, असेही बाबरनं स्पष्ट केले. भारत व पाकिस्तान यांनी प्रत्येकी एकेक वेळा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आहे. आजमनं टीम इंडियाला डिवचले आहे.
Video : अम्पायरच्या डोळ्यांदेखत इंग्लंडच्या फलंदाजानं केली चिटींग, खेळपट्टी बिघडवण्याचा प्रयत्न
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आझमची ही भारताविरुद्धची कर्णधार म्हणूनही पहिलीच मॅच असणार आहे. २००९ साली श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्यांचे आंतरराष्ट्रीय सामने यूएईतच खेळावे लागले होते. अशात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप यूएईत होत असल्याचा फायदा पाकिस्तानलाच मिळेल, असा दावा आजमनं केला होता.
तो म्हणाला, ''ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानपेक्षा टीम इंडिया अधिक दडपणाखाली असेल. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी भारतीय खेळाडू बराच काळ एकत्र ट्वेंटी-२० सामने खेळणार नाहीत. ते आयपीएलमध्ये विविध फ्रँचायझीमधून खेळणार आहेत. सध्या ते कसोटी मालिका खेळत आहेत आणि त्यानंतर ते फ्रँचायझी लीगमध्ये व्यग्र होतील. यूएई हे आमच्यासाठी घरचं मैदानच आहे आणि आम्ही १०० टक्के देण्याचा प्रयत्न करू.'' सुपर १२ फेरीतील संघ
गट १ - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.गट २- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.
जाणून घ्या पाकिस्तानचे वेळापत्रक
२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता२६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. न्यूझीलंड, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता२९ ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता२ नोव्हेंबर - पाकिस्तान वि. अ गटातील उपविजेता, अबु धाबी, सायंकाळी ७.३० वाजता७ नोव्हेंबर - पाकिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता