India vs Pakistan Controversy : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकच्या (Asia Cup 2023) सुपर-4 फेरीचा सामना कोलंबोमध्ये सुरू आहे. पाऊस आणि खराब हवामानामुळे १० सप्टेंबरला हा सामना होऊ शकला नाही. आता सामन्याचा निकाल रिझर्व्ह डे म्हणजेच ११ सप्टेंबरला लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानी चमूशी संबंधित मोठी बातमी आली आहे.
पाक संघातील 2 सदस्य जुगार खेळण्यासाठी कसिनोमध्ये
पाकिस्तानी संघाशी संबंधित एक मोठी बातमी म्हणजे पाकिस्तानी क्रिकेट संघाचे मीडिया मॅनेजर उमर फारुख कलसन आणि बोर्डाचे महाव्यवस्थापक अदनान अली कोलंबोमधील कॅसिनोला गेल्याने वादात सापडले आहेत. दोघेही आशिया कपमध्ये पाकिस्तानी संघासोबत आहेत. अशा परिस्थितीत, त्यांनी अशा ठिकाणी जाण्याने ICC च्या भ्रष्टाचार विरोधी युनिटचे (ACU) लक्ष वेधले गेले असल्याचे बोलले जात आहे.
सोशल मीडियावर गोंधळ
पाकिस्तानच्या अनेक क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावरून प्रश्न उपस्थित केला की पीसीबीचे दोन्ही अधिकारी इतके अपरिपक्व आणि निष्काळजी कसे असू शकतात. पाकिस्तानी मीडियामध्ये गदारोळ झाल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते कॅसिनोमध्ये फक्त जेवणासाठी गेले होते. असे असले तरी ते मायदेशी परतल्यानंतर दोघांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
भारत-पाक सामन्यात पावसाचा अडथळा
या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबरला खेळ थांबेपर्यंत 2 बाद 147 धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने अर्धशतके झळकावली. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 121 धावांची सलामी दिली. रोहितने 49 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. गिलने 52 चेंडूत 10 चौकारांसह 58 धावा जोडल्या. पावसामुळे खेळ पुढे जाऊ शकला नाही, तेव्हा विराट कोहली 8 धावा करून क्रीजवर होता तर केएल राहुल 17 धावांवर खेळत होता. आता 11 सप्टेंबरला म्हणजेच आज टीम इंडिया या स्कोअरसह खेळायला सुरुवात करेल.
Web Title: India vs Pakistan Controversy as 2 members of Pak visited gambling casino after match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.