India vs Pakistan Asia Cup 2022: टीम इंडिया आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याची क्रिकेट चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. अशा वेळी त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ लवकरच क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत. हा सामना आशिया कपमध्ये खेळवला जाणार आहे. यंदा आशिया कपचे यजमानपद श्रीलंकेकडे आहे. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. आशिया चषक 2022 ची सुरूवात २७ ऑगस्टपासून होणार आहे. मात्र, या स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
भारत-पाक सामना या दिवशी होण्याची चर्चा
सध्या मिळत असलेल्या अहवालातील माहितीनुसार, आशिया कप सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा सामना खेळवला जाऊ शकतो. २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चाहत्यांना पाहायला मिळू शकतो. २८ ऑगस्ट रोजी रविवार आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलसह ब्रॉडकास्टरला मॅचमध्ये जास्तीत जास्त टीआरपी हवा असतो आणि भारत-पाक सामन्यासाठी प्रेक्षकवर्ग इतर सामन्यांपेक्षा कायमच जास्त असतो. त्यामुळे या दमदार सामन्यासाठी हा खास दिवस निवडण्यात येण्याची शक्यता आहे.
आशिया चषकासाठी टीम इंडिया, यजमान श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. याशिवाय यूएई, नेपाळ, ओमान, हाँगकाँग आणि इतर संघांदरम्यान पात्रता फेरी खेळली जाईल. या स्पर्धेत टीम इंडिया गतविजेता संघ आहे. भारताने गेल्या वेळी फायनलमध्ये बांगलादेशला पराभूत केले होते.
भारताने पाकिस्तान आणि श्रीलंका दौऱ्यावर खेळण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता श्रीलंकेने स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. २१ ऑगस्टपासून क्वालिफायर फेरी खेळवली जाईल. तर मूळ स्पर्धेचे सामने २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत. टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असून पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझमकडे आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांशी भिडले होते. त्यावेळी पाकिस्तानने १० गडी राखून भारताचा पराभव केला.
Web Title: India vs Pakistan cricket match Asia cup 2022 Ind vs Pak t20 match schedule updates Rohit Sharma Babar Azam
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.