गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक

India vs Pakistan cricketers Salary Comparison: दोन्ही देशांच्या क्रिकेटपटूंच्या केंद्रीय करारात काय फरक आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:27 IST2025-04-21T18:24:04+5:302025-04-21T18:27:54+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan cricketers Salary Comparison BCCI Central contract to PCB Rohit Sharma Virat Kohli Babar Azam | गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक

गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Pakistan cricketers Salary Comparison: बीसीसीआयने नुकतीच संघातील खेळाडूंसाठी वार्षिक कराराची घोषणा केली. एकूण ३४ खेळाडूंचा यात समावेश करण्यात आला. या खेळाडूंना ४ श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही गेल्या वर्षी त्यांच्या खेळाडूंसाठी केंद्रीय करारांची यादी जाहीर केली होती. त्यात २५ खेळाडूंना स्थान मिळाले होते. अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की या दोन्ही देशांच्या क्रिकेटपटूंच्या केंद्रीय करारात काय फरक आहे आणि भारताच्या तुलनेत पाकिस्तानी खेळाडूंना किती पैसे मिळतो, जाणून घेऊया.

टीम इंडियाच्या खेळाडूंची कमाई किती?

भारतात, ग्रेड A+ मधील खेळाडूला दरवर्षी ७ कोटी रुपये दिले जातात. म्हणजेच तो दरमहा ५८.३ लाख रुपये कमवतो. ग्रेड A खेळाडूंना दरवर्षी ५ कोटी रुपये, ग्रेड B खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि ग्रेड C खेळाडूंना १ कोटी रुपये दिले जातात. BCCIच्या केंद्रीय करार यादीत ग्रेड A+ मध्ये ४ खेळाडू, ग्रेड A मध्ये ६ खेळाडू, ग्रेड B मध्ये ५ खेळाडू आणि ग्रेड क मध्ये १९ खेळाडूंचा समावेश आहे.

पाकिस्तानी खेळाडूंना किती पैसे मिळतात?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केंद्रीय करारातील खेळाडूंना ४ श्रेणींमध्ये विभागले आहे. A श्रेणीत २ खेळाडू, B श्रेणीत ३ खेळाडू, C श्रेणीत ९ खेळाडू आणि D श्रेणीत ११ खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यांच्यातील ग्रेड A मधील खेळाडूंना ४.५ मिलियन PKR म्हणजेच १३.१४ लाख रुपये दिले जातात. पाकिस्तानच्या ग्रेड B मधील खेळाडूंना दरमहा ३ मिलियन PKR म्हणजेच सुमारे ८.७६ लाख रुपये दिले जातात. ग्रेड C आणि D या विभागात मोडणाऱ्या खेळाडूंना महिन्याला ०.७५ ते १.५ मिलियन PKR म्हणजेच सुमारे २.१९ लाख ते ४.३८ लाख रूपये मिळतात. म्हणजेच पाकिस्तानच्या सर्वोच्च श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला सुमारे १ कोटी ५७ लाख रुपये, द्वितीय श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला अंदाजे १ कोटी ०५ लाख तर शेवटच्या श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला २६.२८ लाख ते ५२.५६ लाख रूपये दिले जातात.

Web Title: India vs Pakistan cricketers Salary Comparison BCCI Central contract to PCB Rohit Sharma Virat Kohli Babar Azam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.