'माझं आधार कार्ड तयार आहे'! शोएब अख्तरच्या दाव्याने एकच खळबळ, भारताबद्दल म्हणाला... 

Shoaib Akhtar Aadhaar Card IND vs PAK: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या एका विधानाने खळबळ उडवून दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 01:20 PM2023-03-16T13:20:35+5:302023-03-16T13:21:08+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan : Former Pakistan veteran fast bowler created panic with his statement. I have an Aadhaar card’ | 'माझं आधार कार्ड तयार आहे'! शोएब अख्तरच्या दाव्याने एकच खळबळ, भारताबद्दल म्हणाला... 

'माझं आधार कार्ड तयार आहे'! शोएब अख्तरच्या दाव्याने एकच खळबळ, भारताबद्दल म्हणाला... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shoaib Akhtar Aadhaar Card IND vs PAK: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या एका विधानाने खळबळ उडवून दिली आहे. मला भारत खूप आवडतो आणि दिल्लीत माझं येणंजाणं असतं, असे तो म्हणाला. एवढंच नाही तर अख्तरने असंही सांगितलं की त्याच्याकडे आधार कार्ड देखील आहे. आता आपण भारताचे आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे काहीच उरले नाही. आशिया चषकासंदर्भात भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या वादावरही त्यांनं मोठं वक्तव्य केलं आहे.  

दोहा येथे लिजेंड्स लीग क्रिकेट मास्टर्स स्पर्धा खेळवली जात आहे. शोएब अख्तर या स्पर्धेत सामना खेळण्यासाठी पोहोचला. अख्तर हा आशिया लायन्स संघाचा भाग आहे. तो एक सामना खेळला, ज्यामध्ये त्याने एक षटकही टाकले. या सामन्यानंतर अख्तर यांनी हे वक्तव्य केले. अख्तर म्हणाला, “मला भारत आवडतो. मी दिल्लीत येत राहते. माझे आधार कार्ड तयार झाले आहे, बाकी काही राहिले नाही. यंदाचा आशिया चषक फक्त पाकिस्तानमध्येच व्हावा आणि त्याच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने यावेत, अशी माझी इच्छा आहे. भारतात खेळलेल्या क्रिकेटची मला आठवण येते. भारताने मला अपार प्रेम दिले आहे. आशिया कप पाकिस्तान किंवा श्रीलंकेत झाला पाहिजे.''

शोएब अख्तरनेही विराट कोहलीच्या फॉर्मबाबत वक्तव्य केलं आहे. अलीकडेच विराट कोहलीने तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले आहे. कोहलीला त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये पाहून दिग्गज आणि चाहते खूप खूश आहेत. दुसरीकडे, कोहलीच्या या खेळीवर पाकिस्तानचा माजी दिग्गज अख्तर म्हणाला, 'विराट कोहली त्याच्या जुन्या लयीत परतताना पाहून मला आश्चर्य वाटत नाही. तो खूप अनुभवी खेळाडू आहे.''

पाकिस्तानने वर्ल्ड कप जिंकाला ही इच्छा...
२०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून झालेल्या पराभवाची झळ आजही अख्तरच्या मनात ताजी आहे. त्यामुळेच पाकिस्तानी संघाने यावेळी भारताला हरवून मागील पराभवाची परतफेड करावी असे अख्तरला वाटत आहे. पाकिस्तानमधील एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान बोलताना त्याने म्हटले, "२०११ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत मोहालीत भारताकडून झालेल्या पराभवामुळे मला राग आला आहे. मला या पराभवाचा बदला घ्यायचा आहे, जो आणखी ८ महिन्यांनी पूर्ण होऊ शकतो." यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारताता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India vs Pakistan : Former Pakistan veteran fast bowler created panic with his statement. I have an Aadhaar card’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.