भारत-पाक सामना ३ महिने आधीच 'हाऊसफुल्ल'; T20 World Cup 2022 जोरदार गाजणार!

पाकिस्तान विरूद्ध भारताला पराभवाचा वचपा काढण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 11:37 AM2022-07-10T11:37:56+5:302022-07-10T11:38:27+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan ICC Mens T20 World Cup tickets almost sold out 3 months in advance says Australia Tourism Deptartment | भारत-पाक सामना ३ महिने आधीच 'हाऊसफुल्ल'; T20 World Cup 2022 जोरदार गाजणार!

भारत-पाक सामना ३ महिने आधीच 'हाऊसफुल्ल'; T20 World Cup 2022 जोरदार गाजणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Pakistan T20 World Cup: भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यासाठी चाहता वर्ग काही औरच असतो. भारत-पाक सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी तर टीव्हीला चिकटून बसतातच, पण क्रिकेटमध्ये फारसा रस नसलेले लोकही त्या दिवशी क्रिकेट सामना पाहायला उत्सुक असतात. त्यात, जर हा सामना तुमच्या जवळच्या शहरात होत असेल तर क्रिकेट रसिक आवर्जून सामन्याला हजेरी लावण्यासाठी स्टेडियममध्ये जातात. यावर्षीही पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. या वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याच्या तिकिटांसाठी चाहत्यांमध्ये जोरदार स्पर्धा होती. इतकेच नव्हे तर तीन महिने आधीच सर्व तिकीट विकली गेल्याचे ( Tickets Sold Out) दिसून आले.

यंदा दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे २३ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. या सामन्याच्या तीन महिने आधीच या जवळपास सर्व तिकिटे विकली गेली आहेत. आजपासूनच हा सामना 'हाऊसफुल्ल' झाल्याचे टुरिझम ऑस्ट्रेलिया (पर्यटन विभाग) आणि इतर अनेक ट्रॅव्हल एजंटकडून सांगण्यात आले. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. १६ ऑक्‍टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून, फायनल १३ नोव्हेंबरला होणार आहे. भारत-पाक सामन्याप्रमाणेच फायनलची तिकिटेही जवळपास पूर्ण विकली गेल्याचे सांगण्यात आले आहे.

भारत आणि पाकिस्तान संघ या स्पर्धेतील आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) होणार आहे. या आधी हे दोन्ही संघ आणखी एक सामना खेळणार आहेत. हा सामना आशिया कप अंतर्गत खेळवला जाणार आहे. मात्र, त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र आशिया कपच्या पहिल्या रविवारी हा सामना आयोजित करण्यात येईल असं बोललं जात आहे.

ग्लोबल स्पोर्ट्स ट्रॅव्हल कंपनीच्या रेकॉर्डनुसार, भारतात आतापर्यंत ४० टक्के पॅकेजेसची खरेदी करण्यात आली आहे. २७ टक्के पॅकेजेस उत्तर अमेरिकेत, १८ टक्के ऑस्ट्रेलियामध्ये आणि १५ टक्के इंग्लंडसह इतर देशांमध्ये खरेदी करण्यात आली. मेलबर्नमधील हॉटेलच्या खोल्या आधीच विकल्या गेल्या आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मेलबर्नमध्ये ४५ ते ५० हजार चाहते बाहेरून येणार आहेत. सामान्य शुल्काची तिकिटे पटकन विकली गेली असून व्हीआयपी तिकिटेही जवळपास संपली आहेत.

Web Title: India vs Pakistan ICC Mens T20 World Cup tickets almost sold out 3 months in advance says Australia Tourism Deptartment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.