IND vs PAK : शुबमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार; रोहित शर्माची घोषणा, उद्याच्या लढतीबाबत म्हणाला...

India vs Pakistan, ICC ODI World Cup 2023 Rohit Sharma Press Conference :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील ज्या सामन्याची चाहत्यांना प्रतीक्षा होती, तो अखेर उद्या अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 06:36 PM2023-10-13T18:36:17+5:302023-10-13T18:36:32+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan, ICC ODI World Cup 2023 Rohit Sharma Press Conference :  Rohit Sharma confirms Shubman Gill is 99% available for the match against Pakistan tomorrow. | IND vs PAK : शुबमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार; रोहित शर्माची घोषणा, उद्याच्या लढतीबाबत म्हणाला...

IND vs PAK : शुबमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार; रोहित शर्माची घोषणा, उद्याच्या लढतीबाबत म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Pakistan, ICC ODI World Cup 2023 Rohit Sharma Press Conference :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील ज्या सामन्याची चाहत्यांना प्रतीक्षा होती, तो अखेर उद्या अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी उद्या विजयी हॅटट्रिकच्या निर्धाराने मैदानावर उतरतील. दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी ही चांगली झालेली आहे, परंतु भारताविरुद्ध वन डे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची पाटी ७-० अशी कोरी आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर भारताचे पारडे जड आहे, परंतु कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma) तसं वाटत नाही. त्यातच त्याने उद्याच्या सामन्यात शुबमन गिल ( Shubman Gill) खेळण्यासाठी ९९% टक्के खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे जाहीर केले.


शुबमनला डेंग्यूमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागले होते आणि त्याच्या जागी संधी मिळालेल्या इशान किशनला फार काही कमाल करता आलेली नाही. त्यामुळे शुबमनच्या खेळण्याने इशान बाहेर बसेल हे निश्चित आहे. रोहित शर्मा म्हणाला, ''माझ्यासाठी तयारी कशी झालीय हे महत्त्वाचे आहे. मी माझ्याकडून सर्व सामन्यांसाठी चांगलीच तयारी केलेली आहे. प्रत्येक दिवस हा नवीन असतो आणि नवीन आव्हानं घेऊन येतो. त्यामुळे तुम्ही मागे काय केलं हे महत्त्वाचं नसतं. तुम्ही आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार असायला हवे.''

Image
''मी मागील ९ महिन्यांपासून सोशल मीडिया पाहिलेला नाही. त्यामुळे तिथे काय चाललेय, कोण काय बोलतंय हे मला माहित नाही. हा खूप मोठा सामना आहे आणि अव्वल दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध आम्हाला खेळायचे आहे. मागील दोन सामन्यांत आम्ही चांगली कामगिरी केली आहे आणि तशाच कामगिरीचा प्रयत्न आहे,''असेही रोहित म्हणाला. त्याने पुढे म्हटले की,''घरच्या मैदानावर खेळण्याचा तोटा नसतो. घरचे चाहते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आम्ही कुठेही गेलो तरी आमचा चाहतावर्ग मोठा आहे आणि याकडे मी अडव्हान्टेज म्हणून पाहतो.'' 


पाकिस्तानविषयी बोलताना रोहितने म्हटले, दोन्ही संघ ताजेतवाने होऊन मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे आमच्यापैकी कुणी एक फेव्हरिट आहे, असे मला वाटत नाही. आव्हानांचा सामना करणे आणि सातत्य राखणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी अद्याप खेळपट्टी पाहिलेली नाही आणि गरज पडल्यास आम्ही तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरू.    

Web Title: India vs Pakistan, ICC ODI World Cup 2023 Rohit Sharma Press Conference :  Rohit Sharma confirms Shubman Gill is 99% available for the match against Pakistan tomorrow.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.