India vs Pakistan - भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याला प्रचंड डिमांड आहे आणि अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबरमध्ये होणार आहे. या सामन्याची तारीख जाहीर होताच अहमदाबाद येथील हॉटेल्सच्या किमतीही गगनाला भिडल्या, तरीही हौशी चाहत्यांनी हॉटेल्स रूम बुक केले आहेत. काल IND vs PAK सामन्याच्या तिकीटांची ऑनलाईन विक्री झाली आणि काही क्षणातच सर्व तिकीटं विकली गेली. या सामन्याचं एक तिकीट १९ लाख ५१, ५८० रुपयांना ( शिपिंग व होम डिलिव्हरीचा चार्ज वेगळा) विकलं गेल्याची माहिती viagogo या आयसीसीच्या ग्लोबल तिकिट विक्री कंपनीनं दिली आहे
Viagogo कडे अजूनही या सामन्याचे १०० तिकीट्स शिल्लक आहेत, परंतु भारतात बूक माय शो वर काही मिनिटांतच सर्व तिकिटांची विक्री झाली. ५ ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद येथे सलामीचा सामना होणार आहे. त्यांची तिकीटं १०००, १५००, २०००, ३००० आणि ६००० रुपयांना विकली गेली आहेत. Viagogo वर भारत-पाकिस्तान सामन्यांच्या तिकिटांची किंमत ६६ हजार ते १९ लाखापर्यंत होती. याच साईटवर भारत वि. इंग्लंड यांच्यात लखनौ येथे होणाऱ्या सामन्याचं तिकीट २ लाख ३४,६३२ रुपयांना विकलं गेलं.
भारत वि. अफगाणिस्तान यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर लढत होणार आहे आणि त्यांच्या तिकिटाची किंमत ३८८७७ पासून सुरू झाले होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत होणाऱ्या सामन्याची तिकिटाची किंमत ३१३४० ते ९ लाख ३१,२९५ रुपये इतकी आहे.
वर्ल कप स्पर्धेतील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू