India vs Pakistan, ICC Women's World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात रंगत पाहायला मिळाली. स्मृती मानधना ( Smriti Mandhana) व दीप्ती शर्मा यांच्या ९२ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला कमबॅक करून दिले होते. पण, पाकिस्तानी गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना भारताचे ५ खेळाडू अवघ्या १८ धावांवर माघारी पाठवले. ६ बाद ११४ अशी दयनीय अवस्था असताना पूजा वस्त्राकर ( Pooja Vastrakar) व स्नेह राणा ( Shen Rana) यांनी अवघ्या ८३ चेंडूंत शतकी भागीदारी करून पाकिस्तानच्या हातून सामना खेचून आणला. या दोघींच्या फटकेबाजीमुळे भारताने मोठे आव्हान उभे केले आहे. पूजाला तिच्या आक्रमक फलंदाजीमुळे 'छोटा हार्दिक' असे म्हटले जाते. मिताली राजच्या नावावर आज एक विक्रम नोंदवला गेला, सहा वर्ल्ड कप खेळणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली.
महिला वर्ल्ड कप स्पर्धत Ind Women vs Pak Women यांच्यात आतापर्यंत ३ सामने झाले आणि तिनही भारताने जिंकले. २००९मध्ये भारताने १० विकेट्सने, २०१३ मध्ये ६ विकेट्सने आणि २०१७मध्ये ९५ धावांनी विजय मिळवला होता. आजही विजयाची अपेक्षा आहे.
स्मृती मानधना व शेफाली वर्मा सलामीला आले, परंतु तिसऱ्याच षटकात डाएना बैगने भारताला पहिला धक्का दिला. वर्मा भोपळ्यावर बाद झाल्यानंतर मानधना व दीप्तीने ( Deepti Sharma) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नर्शा संधूने ही जोडी तोडताना दीप्तीला ४० धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर स्मृती ७५ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ५२ धावांवर बाद झाली. अमन आमीनने स्वतःच्याच गोलंदाजीवर स्मृतीचा झेल घेतला.
यानंतर भारताच्या तीन विकेट पटापट पडला. १ बाद ९६ अशा मजबूत स्थितीत असणाऱ्या भारताची अवस्था ६ बाद ११४ अशी झाली. हरमनप्रीत कौर ( ५), कर्णधार मिताली ( ९) व रिचा घोष ( १) यांचे अपयश भारताला महागात पडताना दिसत होते. पण, पूजा वस्त्राकर आणि स्हेन राणा यांनी सामनाच फिरवला. या दोघींनी ७व्या विकेटसाठी ९७ चेंडूंत १२२ धावांची भागीदारी केली. महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील ही ७व्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. याआधी निकोला ब्राऊन व सराह त्सुकिंगावा यांनी इंग्लंडविरुद्ध २००७मध्ये १०४* धावांची भागीदारी केली होती. ( Highest for 7th wicket in Women's World Cup) पूजा व स्नेह या दोघींनी वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले. त्यांच्या फटकेबाजीमुळे भारताने ६ बाद ११४ वरून २३६ धावांपर्यंत मजल मारली. पूजा ५९ चेंडूंत ८ चौकारांसह ६७ धावांवर फातिमा सनाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. भारताने ७ बाद २४४ धावा उभ्या केल्या. स्नेह ४८ चेंडूंत ५३ धावांवर नाबाद राहिली.
कोण आहे पूजा वस्त्राकर?
मध्य प्रदेशातील शाहडोल येथे २५ सप्टेंबर १९९९ मधला पूजा वस्त्राकरचा जन्म... लहानपण शेजारच्या मुलांसोबत तिने क्रिकेट खेळयाला सुरूवात केली. प्रशिक्षक आशुतोष श्रीवास्तव यांनी तिच्यातले कौशल्य ओळखले आणि तिला ट्रेनिंग देण्यास सुरूवात केले. २०१८ मध्ये तिला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी मिळाली. पूजाचे वडील BSNLचे माजी कर्मचारी आहेत. ती १० वर्षांची असताना तिच्या आईचे निधन झाले. तिला ४ बहीणी व दोन भाऊ आहेत. पूजा ही घरात मोठी आहे.
Web Title: India vs Pakistan, ICC Women's World Cup : 122 runs partnership for 7th wicket by Sneh Rana & Pooja Vastrakar for India; India women's finishes at 244/7
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.