Join us  

India Vs Pakistan, Latest News: मँचेस्टरमधील वातावरणाबाबत अपडेट; भारत-पाक सामना होणार?  

भारत vs पाकिस्तान लाइव्ह : रत आणि पाकिस्तान यांच्यातील महासंग्रामाची जय्यत तयारी दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांकडून झालेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 11:12 AM

Open in App

India Vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महासंग्रामाची जय्यत तयारी दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांकडून झालेली आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आणि मैदानाबाहेर चाहत्यांची आतापासूनच रिघ लागलेली आहे. या सामन्यात कोण जिंकेल, कोण अधिक धावा करेल; यापेक्षा हा सामना होईल की नाही हा प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करून राहिलेला आहे. काल रात्रीपासून येथे पावसाच्या सरी बरसल्या होत्या आणि रविवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मँचेस्टर येथीस सद्यस्थिती पाहता येथे ढगाळ वातावरण दिसत आहे, परंतु पाऊस पडत नसल्याने क्रिकेटप्रेमी आनंदात आहेत. 

भारतानं पाकला नमवल्यास रोनल्डोलाही होईल आनंद, वीरूनं सांगितलं कारण!वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातल्या जय-पराजयाच्या आकडेवारीत भारतीय संघ 6-0 अशा आघाडीवर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारा भारतीय संघ तिच विजयी परंपरा कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. भारताने आज विजय मिळवल्यास जय पराजयाची आकडेवारी 7-0 अशी होणार आहे. ''भारत-पाकिस्तान हा नेहमीच मोठा सामना होतो. मग तो वर्ल्ड कप स्पर्धेतील असो किंवा जगाच्या पाठीवर कोठेही. तो महामुकाबलाच असतो,'' असे सेहवाग म्हणाला.

 

त्यानं पुढे सांगितले की,''भारत-पाकिस्तानचे चाहते कोठेही राहत असतील, परंतु ते रविवारी मँचेस्टर येथील सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार हे नक्की. वर्ल्ड कप स्पर्धेचा इतिहास पाहिला, तर भारताचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. भारताने सहावेळा पाकिस्तान संघाला पराभूत केले आहे आणि रविवारी या निकालाचीच पुनरावृत्ती होईल. भारतानं 7-0 अशी आघाडी मिळवल्याचा ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही आनंद होईल. कारण, त्याच्या जर्सीचा क्रमांक हा सात आहे.''

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच चाहत्यांची पार्टी, पाहा स्पेशल व्हिडीओ!भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी दोन दिवसांपूर्वीच दोन्ही देशांचे चाहते मँचेस्टर येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे मँचेस्टरमध्ये सध्या दोनच रंग पाहायला मिळत आहेत, एक तर निळा आणि हिरवा... या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी चाहत्यांच्या उत्साहात किंचितशीही कमी झालेली नाही. या लढतीपूर्वी चाहत्यांनी एकत्र मिळून पार्टी केली. पाहा त्याचा व्हिडीओ...

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तान