Join us  

India Vs Pakistan, Latest News: गुड न्यूज, मँचेस्टरमध्ये सूर्यानं दिलं दर्शन, पण...

India Vs Pakistan, ICC World Cup 2019, Latest News : Weather Update in Manchester Today: Intermittent showers expected to disrupt marquee contest

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 9:23 AM

Open in App

India Vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महासंग्रामाची जय्यत तयारी दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांकडून झालेली आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आणि मैदानाबाहेर चाहत्यांची आतापासूनच रिघ लागलेली आहे. या सामन्यात कोण जिंकेल, कोण अधिक धावा करेल; यापेक्षा हा सामना होईल की नाही हा प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करून राहिलेला आहे. काल रात्रीपासून येथे पावसाच्या सरी बरसल्या होत्या आणि रविवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मँचेस्टर येथीस सद्यस्थिती पाहता सूर्यानं सकाळच्या सत्रात तेथे दर्शन दिले आहे आणि मळभही दूर झालेलं पाहायला मिळत आहे. पण...

आज मँचेस्टरमध्ये दोनच रंग पाहायला मिळत आहेत... एक म्हणजे निळा आणि दुसरा हिरवा... त्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांनी मँचेस्टर हाऊसफुल झालं आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम लढतीपेक्षा भारत-पाक लढतीची जगभरात उत्सुकता आहे. त्यामुळे पावसामुळे हा सामना रद्द होऊ नये, अशी प्रार्थना सर्वच करत आहेत. सध्या तरी मँचेस्टर येथील ढगाळ वातावरण दूर झाल्याचं चित्र दिसत असलं तरी दुपारनंतर पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लंडनमधील हवामान खात्यानं आतापर्यंत वर्तवलेला अंदाज खोटा ठरलेला नाही. पण, यावेळी तो खोटा ठरावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. 

‘हाय व्होल्टेज’ लढतीत सट्टेबाजारातही टीम इंडिया फेव्हरिट!सट्टेबाजारात मात्र टीम इंडियालाच पसंती दर्शविण्यात आली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाला एक रुपयासाठी केवळ ३० पैसे भाव असून पाकसाठी १.५० रुपये इतका दर लावण्यात आला आहे. सामना एकतर्फी होऊन भारत उपांत्य फेरीसाठी आपले आव्हान मजबूत करेल, असा अंदाज बुकींकडून वर्तवला जात आहे. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकविरुद्ध रविवारी इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये लढत होत आहे. विश्वचषकातील आतापर्यंतच्या सर्व सहाही लढती भारताने जिंकल्याने या सामन्यातही टीम इंडिया विजयी होईल, अशी शक्यता कोट्यवधी भारतीयांकडून व्यक्त होत आहे. मुंबई, सुरत व दिल्लीतील सट्टेबाजारातही टीम इंडियाचाच बोलबाला असून त्यासाठी गेल्या दोन दिवसांमध्ये कोट्यवधीचा सट्टा खेळला गेला आहे. रविवारी दुपारपर्यंत त्यामध्ये तिपटीने वाढ होईल, अशी शक्यता बुकींकडून वर्तविण्यात येत आहे.विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून तीनपैकी दोन्ही सामने एकतर्फी जिंकले आहेत तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्याउलट पाकच्या संघाची अवस्था असून त्यांना चारपैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळविता आला आहे. भारतीय संघ सर्वच बाजूंनी वरचढ वाटत असल्याने बुकींनी हा सामना एकतर्फी होईल, या शक्यतेने भारतासाठी एक रुपयामागे अवघे ३० पैसे दर लावला आहे. तर पाकसाठी १.५० पैसे इतका दर देण्यात आला आहे. तीनही महानगरांतील सट्टेबाजारात दोन्ही संघांमध्ये जवळपास ८० पैशांचा फरक आहे. सामन्याची वेळ जवळ आल्यानंतर आणि सामना सुरू झाल्यानंतर त्यामध्ये परिस्थितीनुसार थोडाफार बदल होईल, असे सांगण्यात आले.यांच्यावरही सट्टाविजयी संघाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा हे किती धावा करणार आणि जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, चहल किती बळी घेतात, यावरही सट्टा घेतला जात आहे. विराट व रोहित यांच्या प्रत्येकी ५० धावांसाठी रुपयामागे ४० पैसे तर शतकासाठी अनुक्रमे १.१० रुपये व ९० पैसे इतका दर सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले. पाकतर्फे इमाम उल हक व मोहम्मद हाफिज यांच्या खेळीवर तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर, रियाज वहाब किती विकेट घेतो यासाठी बेटिंग घेण्यात येत आहे. 

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तानभारतपाकिस्तान